लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यात अनेक गावांत पाणीप्रश्न डोकेवर काढत असून दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील १० बोअरचे अधिग्रहण केले आहे.यावर्षी परतीच्या पावसाने सोनपेठ तालुक्यात पाठ फिरविल्याने अनेक गावांतील जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र अचानक पावसाने दोन महिने खंड दिला. परिणामी, हाताशी आलेली पिके वाळूून गेली. त्याच बरोबर पाणीप्रश्नान्नेही डोके वर काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींनी तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार १० जलासाठे अधिग्रहण केले आहेत.यामध्ये शेळगाव येथे ४, उंदरवाडी २, तिवठाणा २, वैतागवाडी १ तर वंदन येथे १ अशा १० ठिकाणी बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे काही अंशी पाणीटंचाई दूर झाली आहे.
परभणी: सोनपेठ तालुक्यात १० बोअरचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:57 PM