लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात विविध मार्गांवर आॅटोरिक्षा अस्ताव्यस्त उभे केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर १९ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी या आॅटोरिक्षांवर कारवाई करीत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला़परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, त्यात आॅटोरिक्षा चालकांसह इतर वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याने वाहतुकीच्या समस्या वाढत आहेत़ येथील स्टेशन रोड भागात अस्ताव्यस्त पद्धतीने आॅटो उभे केले जातात़ पोलीस प्रशासनातील वाहतूक शाखेच्या वतीने आॅटोरिक्षा चालकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याची बाब गुरुवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या निदर्शनास आली़ सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास स्टेशन रोड परिसरात त्यांनी फेरफटका मारून अस्ताव्यस्तपणे उभे केलेल्या आॅटोरिक्षा चालकांवर थेट कारवाई केली़ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे आॅटो चालकांमुळे खळबळ उडाली़हा नियमित कारवाईचा भाग-बगाटे४कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जातो़ या मार्गावर मोठी वाहतूक आहे़ त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी असल्यास अपघात होऊ शकतात़४त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी करू नयेत, अशा सूचना यापूर्वी आॅटो चालकांना दिल्या होत्या; परंतु, त्याचे पालन होत नव्हते़ यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असे़ तसेच धावता आॅटोरिक्षा मधेच उभी केली जाते.४त्यातूनही अपघात होऊ शकतात़ त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही नियमित कारवाई असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी सांगितले़
परभणी : अडथळा ठरणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:57 AM