लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी जिल्ह्यासह अकोला, लातूर, बीड आणि जालना जिल्ह्यात दरोडे टाकून धुमाकूळ माजविणाºया टोळीच्या प्रमुखासह आठ जणांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सेलू तालुक्यातील नागठाणा येथील गोविंद श्रीमंत मोगल हे डिसेंबर महिन्यात सेलू येथून ६१ हजार रुपये घेऊन गावाकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या इसमाने त्यांना खाली पाडले. त्यानंतर परिसरातील झाडीमध्ये लपलेले चार ते पाच जण धावून आले आणि मोगल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ६१ हजार रुपये, आधारकार्ड व मोबाईल जबरीचे काढून घेतला. मोगल यांनी घटनेची माहिती त्यांच्या मित्राला दिल्यानंतर त्यांचा मित्र घटनास्थळी दाखल झाला. त्यालाही मारहाण करुन चोरटे पसार होत असतानाच एकास ग्रामस्थांनी पकडले. दरम्यान, यात ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास करीत असताना टोळीचा प्रमुख हरिश सुभाष पवार (रा.चारठाणा ता.जिंतूर) व इतर सदस्यांमध्ये सुनील यनगन पवार (रा.खुराणपूर ता.लोणार जि.बुलढाणा), रवि रामचंद्र पवार (रा.खुराणपूर), बिरजू फत्तू भोसले (रा.सिंदखेड राजा), शहाजी नानासाहेब भोसले (रा.चारठाणा) आणि दीपक बिभिषण पवार (चारठाणा) हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्ती पडताळल्यानंतर चारठाणा पोलिसांनी या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्याकडे सादर केला. त्यावर या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश १२ जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.त्यावरुन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९१ चे कलम ३ ची वाढ करुन जिंतूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. या प्रकरणात टोळीचा प्रमुख हरिश सुभाष पवार आणि सुनील पवार, रवि पवार या ३ आरोपींना जेरबंद करण्यात आले असून इतर पाच आरोपी फरार आहेत.तीन महिन्यातील दुसरी कारवाई४पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहेत. झोपडपट्टी दादा अधिनियम, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई, हद्दपारीचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मागील तीन महिन्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पूर्णा येथील १८ जणांविरुद्ध आणि जिंतूर व परभणी शहरात दोघांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे प्रस्ताव४चारठाणा येथील प्रकरणात टोळीचा प्रमुख हरिश सुभाष पवार याच्या गुन्हेगारीची पडताळणी पोलिसांनी केली. तेव्हा पवार याने वरील साथीदारांना टोळीत सहभागी करुन टोळीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत व्हावी या उद्देशाने जबरी चोरी करणे, चोरी करताना समोरच्या व्यक्तीस दुखापत करणे, दरोडा घालणे, खुनासहीत दरोडा घालणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याचा प्रयत्न करीत दरोडा घालणे असे कृत्य केल्याचे आढळले. २०११ पासून आजपर्यंत या टोळीने गुन्ह्यांची मालिका केली असून गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
परभणी : दरोडे टाकणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:49 AM