लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ या संदर्भातील आदेश ३१ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी काढले आहेत़राज्य शासनाने खाजगी अनुदानित, प्राथमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना प्रतिनियुक्तीने त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये पदस्थापना देण्याबाबत निर्णय घेतला होता़या निर्णयानुसार संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये हजर करून घेण्याबाबत कळविण्यात आले होते; परंतु, अनेक जिल्हा परिषदांनी प्रत्यक्ष हजर झालेल्या शिक्षकांना शाळेत रुजू करून घेतले नव्हते़ त्यामुळे शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली आहे़प्रशासकीयदृष्ट्या ही बाब बेजबाबदार असल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़ या संदर्भात ३१ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आला असून, त्यामध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ शिवाय या संदर्भातील अतिरिक्त शिक्षकांची यादीही शिक्षण विभागाला पाठविण्यात आली आहे़शिक्षण विभागाने आशा शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करावी, त्यानंतर संबंधित शिक्षकांचे समायोजन करावे, त्यानंतर शिल्लक राहिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाल पाठवावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ खाजगी शिक्षकांचे समायोजन केल्यानंतरही शिक्षकांच्या जागा रिक्त राहत असतील तर तशी माहिती शासनास कळवावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़पदस्थापना देण्यासाठी निकषखाजगी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर त्यांना पदस्थापना देत असताना गरोदर महिला, स्तनदा माता तसेच विशेष संवर्ग भाग -१ मध्ये मोडणारे जे शिक्षक रॅन्डमायझेशन राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात गेले आहेत, अशा शिक्षकांना सर्व प्रथम सोयीच्या ठिकाणी रिक्त जागांवर पदस्थापना देण्यात यावी व त्यांच्या पदस्थापनेने रिक्त झालेल्या जागेवर खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना पदस्थापना द्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ जे शिक्षक जिल्हा परिषदेच्या सेवेत हजर होणार नाहीत, अशा शिक्षकांची यादी शालेय शिक्षण विभागास पाठवून द्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़
परभणी : खाजगी अतिरिक्त शिक्षकांचे जि़प़शाळांमध्ये समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:55 AM