शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

परभणी :९ कोटी खर्चून २४ वर्षानंतरही काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:58 AM

जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे सिरसाळा-सोनपेठ-शिर्शी राज्य मार्ग २२१ रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या कामास १८ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यावेळी या पुलाच्या कामाची २ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपये किंमत होती़ या अंतर्गत मुख्य पूल २६़५० मीटरचे १० गाळे व शिर्शी बाजुचे पोंच मार्ग २२६ मीटर, हटकरवाडी बाजुचे पोंच मार्ग लांबी १२७० मीटर, शिर्शी बाजु पूल मोºया २, हटकरवाडी बाजुच्या पुलाच्या ४ मोºया व संरक्षक कामे आणि अन्य काही बाबींचा या कामाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता़ हे काम औरंगाबाद येथील एका कंत्राटदारास देण्यात आले़ २०११ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले नाही़ त्यामुळे २० जुलै २०१७ रोजी या कामाला १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ त्यानंतर ६ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०४ रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली़ याबाबतचा कार्यारंभ आदेश २२ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला़ त्यामध्ये १८ महिन्यांत म्हणजे २१ आॅगस्ट २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते़ परंतु, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली नाही़ परिणामी हे काम रेंगाळल़े़ पुन्हा या कामाला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ ही मुदतवाढ संपूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे या पुलावरून अधिकृतपणे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही़ आतापर्यंत या पुलाच्या कामात मुख्य पुलाचे ९ स्लॅब पूर्ण झाले असून, पोंच मार्गातील पूल, मोºया, पोंच मार्ग प्रगतीत आहेत़ शेवटच्या एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे़ हा प्रगतीपथ कधी पूर्ण होईल? हे अद्याप निश्चित नाही़शिवाय हे काम कधी पूर्ण करणार याबाबतचा जाबही सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी विचारत नाही़ जुलै महिन्यात जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या राज्य विधान मंडळाच्या अंदाज समितीकडे या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आ़ उदय सामंत यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे सांगितले होते़ परंतु, सामंत यांच्या आश्वासनानंतरही तब्बल सहा महिन्यांत काहीही हलचाल झालेली नाही़ त्यामुळे प्रशासकीय उदासिनतेचा फटका या पुलाच्या कामास बसत आहे़ परिणामी या भागातील ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्न तब्बल २४ वर्षानंतरही सुटलेला नाही...तर मुख्यालयाचे ३५ किमी अंतर कमी होणार४गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास परभणीहून सोनपेठला जाण्यासाठी किंवा सोनपेठहून परभणीला येण्यासाठीचे ३५ किमीचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय परभणीहून परळी, सिरसाळा, लातूरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे़ यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे़ सध्या परभणी ते सोनपेठ प्रवासाचे अंतर ८० कि.मी.आहे. शिवाय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.