लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ शेतकºयांना शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.खरीप हंगामात शेतकºयांनी पेरणी केलेले सोयाबीन, मूग व उडीद ही पिके पाण्याअभावी जागेवरच करपून गेली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध होता, अशा शेतकºयांनी जिवाचे रान करून आपली पिके जगविली. शेतमाल बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे़ शेतकºयांनी कमी पावसावर मोठ्या कष्टाने उत्पादित केलेला माल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणला जात आहे़ मात्र जिल्ह्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतमालाला योग्य भाव मिळत नाही़ परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़खुल्या बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि पैशांचीही निकड असल्याने शेतकºयांची दोन्ही बाजुंनी कोंडी होत आहे़ सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली असून, पैशांअभावी खरेदी ठप्प पडली आहे़ दिवाळीचा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे़शेतकºयांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे़ या योजनेंतर्गत शेतकºयांनी त्यांचा उत्पादित माल बाजार समितीमध्ये तारण ठेवणे आवश्यक आहे आणि या शेतमालाच्या बाजार किंमतीवर शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे़ ही योजना शेतकºयांसाठी फायद्याची ठरत आहे़आतापर्यंत १६ शेतकºयांनी सोयाबीनचा शेतमाल तारण ठेवला आहे. या १६ शेतकºयांना २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील १, झरी येथील ८ तर बोबडे टाकळी येथील २ शेतकºयांचा समावेश आहे. बाजारपेठेतील शेतमालाचे भाव गडगडल्यामुळे शेतकºयांना उत्पादित मालावर कर्ज घेणे सोयीचे जात आहे़ उपलब्ध झालेला शेतीमाल बाजार समितीकडे तारण ठेवल्यानंतर त्या शेतमालाच्या किंमतीनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे़ खुल्या बाजारपेठेत शेतमालाचे भाव वधारल्यानंतर तारण ठेवलेला शेतीमाल वाढीव दराने विक्री करण्याची सुविधा असल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान होणार नाही़ त्यामुळे कर्ज योजनेला प्रतिसाद मिळत आहे़असे झाले कर्जाचे वाटप४शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत धर्मापुरी येथील रावसाहेब कदम या शेतकºयाला १ लाख ८ हजार ७५०, झरी येथील राखी अग्रवाल या महिला शेतकºयाला ८७ हजार, प्रसाद वटारे यांना ३ लाख २० हजार ८००, पूनम अग्रवाल यांना १ लाख २१ हजार ८००, भागोजी जगाडे यांना ९२ हजार ४३०, दत्ता खरात यांना ७२ हजार ८६०, द्वारकादास अग्रवाल यांना १ लाख ४५ हजार ७२५, अनिल देशमुख यांना ८४ हजार ३७५, सदाशिव देशमुख यांना ५६ हजार २५०, बोबडे टाकळी येथील रोहिदास बोबडे यांना ९७ हजार ८७५, संतोष बोबडे यांना १ लाख ३० हजार ५०० रुपयांचे शेतमाल तारण कर्ज वाटप करण्यात आले आहे.लाभ घेण्याचे आवाहनपरभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांनी बाजार समितीने सुरू केलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेत १ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती समशेर वरपूडकर, सचिव विलास मस्के यांनी केले आहे.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :२० लाखांचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 1:02 AM