लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी १९ एप्रिल रोजी एका आरोपीस अटक केली असून आणखी एक आरोपी हाती लागला असल्याची माहिती मिळाली आहे.येथील जायकवाडी परिसरात ३१ मार्च रोजी सकाळी अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर किरण डाके व रवि गायकवाड हे दोघे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी एका महिला आरोपीसह अन्य एका आरोपीस ताब्यात घेतले होते. दरम्यान, १९ एप्रिल रोजी सौरभ ऊर्फ सोन्या भराडे यास पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच रविवारीही आणखी एका आरोपीस अटक करण्याची कारवाई सुरु होती.
परभणी : रोडे खून प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:39 AM