लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी/पेडगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे या केंद्रांवर भरारी किंवा बैठे पथकाला एकही कॉपी सापडलेली नाही़जिल्ह्यातील ६० केंद्रांवर बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला़ या परीक्षेची तयारी शिक्षण विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सकाळी ११ वाजता इंग्रजी विषयाच्या पेपरला सुरुवात झाली़ परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर एकूण ३०० तर बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३४७ विद्यार्थ्यांची परीक्षेच्या आसन व्यवस्थेची तयारी करण्यात आली होती़ पहिल्या दिवशी जि़प़ केंद्रावर २७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ २४ विद्यार्थी गैरहजर होते तर बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ ३२ विद्यार्थी गैरहजर होते़दोन्ही परीक्षा केंद्रांवर काही वर्गामध्ये शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रकार समोर आला़ विशेष म्हणजे बैठे पथकातील कर्मचाऱ्यांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली़ दोन्ही परीक्षा केंद्रांमध्ये खाजगी व्यक्तींचाही वावर पहावयास मिळाला़ विशेष म्हणजे बिनदिक्कतपणे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे उघड होवूनही या दोन्ही केंद्रांवर भरारी व बैठे पथकाला एकही कॉपी आढळली नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़ कॉपीच्या प्रकरणातून गतवर्षी येथील एका परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली होती़ तरीही यातून येथील काही शिक्षकांनी बोध घेतलेला दिसून येत नाही़ त्यामुळेच कॉपीचा प्रकार सुरु आहे.कॉपी करणाºया१५ विद्यार्थ्यांवर कारवाई४माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने या परीक्षेसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील कै़ रामकृष्ण बापू उच्च माध्यमिक विद्यालयात ९ तर सेलू येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ विद्यालयात १ आणि मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ५ असे एकूण १५ परीक्षार्थी कॉप्या करताना आढळून आले़४त्यांच्यावर शिक्षण मंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आली़ जिल्ह्यात इंग्रजी विषयासाठी २४ हजार १२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २३ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ ७६० विद्यार्थी गैरहजर होते़ परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ६० बैठे पथक आणि ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली़
परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:13 AM