लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथील सरपंच पुष्पादेवी राम मुंडे यांनी अविश्वास ठरावाविरूद्ध दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी फेटाळून लावले आहे़या संदर्भात अॅड़मदन बोबडे यांनी माहिती दिली़ त्यानुसार सरपंच पुष्पादेवी मुंडे यांच्याविरूद्ध ५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़ १२ फेब्रुवारी रोजी हा अविश्वास ठराव बहुमताने संमत करण्यात आला़ या ठरावाविरूद्ध पुष्पादेवी मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते़ अविश्वास ठरावाची नोटीस मिळाली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. सदस्यांच्या वतीने अॅड़ बोबडे यांनी लेखी निवेदन सादर केले़ ग्रामपंचायतमध्ये कायदेशीर नोटीस डकविलेली आहे़ त्यामुळे ही नोटीस सर्व सदस्यांना प्राप्त झाली असल्याचे त्यात म्हटले़ जिल्हाधिकाºयांनी दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेत सरपंच मुंडे यांचे अपील फेटाळून लावत संमत ठराव कायम ठेवला.
परभणी : अविश्वास ठरावाविरूद्धचे दाखल अपील फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:01 AM