लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध यंत्रणांकडून प्राप्त निधीसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन या प्रस्तावांना सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी लहान गटाच्या छाननी समितीची बैठक पार पडली. अध्यक्ष खा.बंडू जाधव, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, नगरसेवक अतूल सरोदे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या १४४ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. लघू गटासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात केंद्र पुरस्कृत योजनांबरोबरच रस्ते विकास, शौचालय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणी पुरवठा योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली.
परभणी :छाननी समितीच्या बैठकीत यंत्रणांच्या प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:39 AM