लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील २३ रस्त्यांची दर्जोन्नती करून या रस्त्यांसाठी लागणाऱ्या ३९ कोटी ७७ लाख ८ हजार रुपयांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे़शासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील रस्त्यांचा समावेश आहे़ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ६१ किमी लांबीच्या या रस्त्यांना आदेशाद्वारे दर्जोन्नती देण्यात आली आहे़ त्यात मानवत तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गापासून ते सोनुळा रस्त्यापर्यंत ३ किमीसाठी १ कोटी ७२ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे़ परभणी तालुक्यातील प्रमुख राज्य मार्गापासून ते पेगरगव्हाण रस्त्यापर्यंत २़१५ किमी अंतरासाठी १ कोटी ५५ लाख ९१ हजार, राष्ट्रीय मार्ग २२२ ते पान्हेरा-भोगाव रोड १ कोटी ९४ लाख ७४ हजार, पाथरी तालुक्यातील कुंभारी फाटा ते मुदगल रस्त्यासाठी ३ कोटी ५७ लाख ९ हजार, इतर जिल्हा मार्ग ते सारोळा १ कोटी ७७ लाख ३५ हजार, परभणी तालुक्यातील राष्ट्रीय मार्ग पिंपळा ते वाडी दमई ७ कोटी ८५ लाख ६८ हजार, जिंतूर तालुक्यातील अंगलगाव किन्ही रोड १ कोटी ६४ लाख, जिल्हामार्ग ते मुळा रोड ६४ लाख ७७ हजार, प्रजिमा २ ते हलविरा रोड ७८ लाख ६८ हजार, प्रजिमा ३३ ते डोहरा रोड १ कोटी १४ लाख ७३ हजार, प्रजिमा ५ ते बामणी-कोलपा रोड २ कोटी रुपये, सेलू तालुक्यातील राज्य मार्ग २२१ ते मलसापूर रोड १ कोटी १६ लाख ४५ हजार, राज्य मार्ग २२१ ते हिस्सी रोड १ कोटी ९९ लाख ७३ हजार, प्रजिमा ३३ ते हट्टा रोड १ कोटी १० लाख ८७ हजार, पालम तालुक्यात प्रजिमा १६ ते कापसी रोड ९३ लाख ६८ हजार, सोमेश्वर ते आरखेड रोड १ कोटी ६१ लाख ६६ हजार, प्रजिमा १६ ते पेठशिवणी रोड ५४ लाख ५० हजार, ग्रामीण मार्ग १० ते घोडा रोड ९६ लाख २६ हजार आणि गंगाखेड तालुक्यातील राज्य मार्ग २४८ ते कुंडगीरवाडी रोड १ कोटी ६५ लाख ९० हजार, बोथी ते इळेगाव १ कोटी ५३ लाख ११ हजार, राज्य मार्ग २५४ ते वरवंटी रोड १ कोटी ३६ लाख ८९ हजार अशा अंदाजित ३९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़
परभणी : दर्जोन्नतीसह २३ रस्त्यांना दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:50 AM