लोकमत न्यूज नेटवर्कपालम/गंगाखेड (परभणी): शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालम आणि गंगाखेड येथील सभेत सांगितले़ केले.पालम शहरात जन आशिर्वाद यात्रेचे २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. याप्रसंगी सभेत ते बोलत होते.यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, खा. बंडू जाधव, खा. हेमंत पाटील, आ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुकाप्रमुख हनुमंत पौळ, शहर प्रमुख गजानन पवार, बालासाहेब लोखंडे, सुभाष धुळगुंडे, सुग्रीव पौळ, ओमकार सिरसकर, शेख मुकरम आदी आदी उपस्थित होते़४गंगाखेड शहरातील शहरातील साई वृंदावन मंगल कार्यालयातही ठाकरे यांची सभा झाली़ पालम मार्गे ही जन आशीर्वाद यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर बस स्थानक परिसरातुन दिलकश चौक, मार्गे पोलीस स्टेशन चौक ते परळी नाक्यापर्यंत शहरातील मुख्य मागार्ने रॅली काढली़४अवघ्या आठ मिनिटात आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण ही जन आशिर्वाद यात्रा काढल्याचे सांगत शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्धनचे आशिर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. गेल्या सहा वषार्पासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात पहिल्यांदाच हिरवळ पसरलेली दिसत असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.४यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्याचे मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना उपनेते माजी खा. चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, खा. संजय (बंडु) जाधव, खा. हेमंत पाटील, आ.डॉ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, विधानसभा प्रमुख बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.४याप्रसंगी तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहर प्रमुख जितेश गोरे, संदीप वाळके, भास्कर काळे, विष्णु मुरकुटे, भाऊसाहेब जामगे, गोविंद अय्या, सोमनाथ कुदमुळे, जानकीराम पवार, सुभाष देशमुख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
परभणी : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा सेनेचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:25 AM