लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी आणि ग्रामीण आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी आयटक संघटनेच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़आशा व गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिले होते़ मात्र त्याची अद्याप पूर्तता झाली नाही़ १८ जूनपर्यंत चौपट मानधन वाढीच्या प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास सत्याग्रह आंदोलन केले जाईल, असा इशारा आयटक प्रणित आशा व गट प्रवर्तक संघटनेने दिला होता़ त्यानुसार बुधवारी आंदोलन करण्यात आले़ शहरी व ग्रामीण आशांना १० हजार रुपये आणि गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्यावे, सरकारी रुग्णालयातील सर्व आरोग्य सेवा मोफत द्यावी, शहरी आशा वर्कर्स यांचा कामाचा मोबदला तात्काळ वितरित करावा, शहरी भागामध्ये गट प्रवर्तकांची नियुक्ती करावी, आरोग्य क्षेत्रातील १७ हजार रिक्त पदे भरावीत इ. मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या़ आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, राजू देशले, सुमन पुजारी, संजीवनी स्वामी, वंदना हाके, वामन राठोड, अनिता मुळे, शांता कानडे, बानूबी शेख सत्तार, कल्पना कुºहे, अनूसया कुºहे, कल्पना कुºहे, ज्योती सदावर्ते, मंगल जाधव यांच्यासह बहुसंख्य महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़
परभणी : आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:15 PM