शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

परभणी : निराधार मुलांचा आधार बनले पुण्यातील अशोक स्नेहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:32 AM

दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.पुणे जिल्ह्यात भोसरी येथे आळंदी मार्गावर असलेल्या चक्रपाणी वसाहतीतील पत्र्याच्या पाच खोल्यांत वसलेले स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली ३० मुले येथे गुण्या गोविंदाने राहतात. आपण स्वीकारलेले व्रत हे सोपे नव्हते, याची अशोकला जाणीव होती. रात्र पाळीत कंपनीची नोकरी सांभाळून तो मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना इ. भागांत फिरायचा. तेथे आत्महत्याग्रस्त, कर्जबाजारी, ऊसतोड किंवा मजुरी करणाºया शेतकरी कुटुंबातील मुलाचा शोध घ्यायचा. आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असेही घर तो पाहायचा. आशातूनच मुले निवडण्यात आली. आज अशाच घरातील २५ मुलांना दत्तक घेत त्यांच्यासाठी पुण्यातील भोसरी येथे अशोक स्रेहवन सुरु केले आहे. याच नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. अर्थात हे सगळे करण्यासाठी नोकरी सोडणे आवश्यक होते. साधारणत: आॅगस्ट २०१६ ची गोष्ट. कंपनीला तसा निर्णय कळविल्यानंतर तेथील अधिकारीही चक्रावून गेले. मात्र आपण हाती घेतलेले व्रत सोडायचे नाही, अशी मानसिकता अशोकने बनविली होती. स्रेहवन साकारताना सुरुवातीला मोठी अडचण झाली होती, ती भांडवलाची. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम सुरु करायचा आहे, असे सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल कोटे यांनी आपले पाच खोल्यांचे घर मोफत उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर नोकरीत जमा केलेली दोन लाखांची पुंजीही अशोकने उपयोगात आणली. राहुल देशपांडे, सच्चिदानंद कुलकर्णी, अवधूत खरमाळे, नितीन जिरासे, कविता मरुडकर यांनी आपापल्यापरीने मदत करीत स्रेहवन उभारले.नोकरी सोडून शेतकºयांच्या मुलांना दत्तक घेण्याच्या संकल्पनेला अशोकच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. मात्र आपल्या मुलाची धडपड, ध्येय, शेतकºयांच्या मुलाविषयी असलेली कणव या गोष्टी पाहता त्यांनीही मुलाला या प्रवासात साथ देण्याचे ठरविले. आपले गाव सोडून ते मुलांसोबत राहतात. अशोकचे वडील वारकरी सांप्रदायातील असल्याने मुलांना मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.एकीकडे नोकरी सोडली असताना दुसरीकडे अशोकचे आई-वडिल घरी सून आणण्याच्या तयारीत होते. शेतकरी सुनील काठोळे हे देशमाने यांच्या नात्यातील होते. त्यांच्या अर्चना या मुलीचे स्थळ सांगून आले होते. हाती नोकरी नाही आणि डोक्यात तर स्नेहवन घडविण्याचे स्वप्न ही सर्व स्थिती अशोकने अर्चनाला समजून सांगितली. लग्नाच्या दुसºयाच दिवशी पाच खोल्यांच्या पत्र्याच्या घरात म्हणजेच स्रेहवनमध्ये अशोक, अर्चना व त्यांचे स्रेहवन कुुटुंब एकमेकांत मिसळून गेले.चार कोटींची जमीन दानभोसरीतील डॉ.रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने स्वत:ची दोन एकर जागा आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी काम करणाºया स्रेहवन संस्थेला दान केली. त्यामुळे जागेचा प्रश्न मिटला.दरम्यान, स्रेहवनच्या माध्यमातून शेतकºयांच्या मुलांसाठी आणखी वाढीव काम करण्याची इच्छा आहे. समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यास अनेक प्रस्तावित कामे मार्गी लागतील, असे ‘लोकमत’शी बोलताना अशोक देशमाने यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरीPuneपुणे