लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी नृ. (परभणी) : दैठणा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न २८ जानेवारी रोजी मध्यरात्री करण्यात आला. याबाबत चोरट्यांविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.परभणी तालुक्यातील दैठणा येथे स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचे शाखा कार्यालय आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास बँक कामकाज संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बँकेला कुलूप लावले. याच रात्री उत्तरेकडील बाजुची खिडकीची काच बाजुला सारुन खिडकीचे लोखंडी गज तोडत चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र या ठिकाणी कुठलाही मुद्देमाल सापडला नाही.त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. मात्र गज वाकवून चोरटे बँक कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेतील साहित्य सुरक्षित असल्याची माहिती शाखा कार्यालयातून देण्यात आली. या प्रकरणी शाखाधिकारी दीपक रवि बानते यांच्या फिर्यादीवरुन दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद४घटनेनंतर पोलिसांनी या बँकेतील कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा तीन चोरटे बँकेत शिरल्याचे कॅमेºयामध्ये दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
परभणी : दैठण्यात बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:54 AM