शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:28 AM

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.सेलू तालुक्यात सुपीक जमीन आहे. तसेच दुधना, कसुरा आणि करपरा या प्रमुख तीन नद्या वाहतात. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या उत्पन्नावर शेतीचे बजेट अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था असल्याने पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतात. मात्र मागील आठ वर्षांपासून पावसाचा असमतोल आणि पर्जन्य दिवसात कमालीची घट झाल्याने चिंता वाढली आहे.सेलू तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८१६.७० मि.मी. एवढी आहे. मागील आठ वर्षांत २०१३ या वर्षी ९१५.०४ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून तालुक्यातील पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय उत्पन्न लागले असेल आणि त्याची आर्थिक अवस्था कशी असेल, याचा अंदाज येतो. यावर्षीही जुलैपर्यंत केवळ ३०.६० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाही शेतकºयांच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती काय? अशी भिती व्यक्त होत आहे. २०१४ पासून निम्न दुधना प्रकल्पात पाणी आडविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा झाला होता. त्यावर सलग दोन वर्षे सेलू, परतूर, मंठा, परभणी, पूर्णा आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दुधना प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि जनावरांच्या चाºयासाठीही दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.जून महिन्यात दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठ दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आले. तालुक्यातील देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, सेलू, कुपटा या पाच महसूल मंडळातील पावसाच्या सरासरीची नोंद घेण्यात येते. दरम्यान, दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे शेती व्यवसाय कोलमडून पडला असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.आठ वर्षातील : पावसाची सरासरी (मि.मी.मध्ये)२०११ - ६३५२०१२ - ६१६.०४२०१३ - ९१५.०४२०१४ - ३५४.७८२०१५ - ४२९.१२२०१६ - ७४३.४२२०१७ - ६००२०१८ - ४५८