शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

परभणी : बीडीडीएस, श्वान पथकाच्या वतीने जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:42 AM

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली़या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या प्रात्यक्षिकातून श्वान पथकातील श्वान घटनाथस्ळावरील वस्तूंवरून आरोपी कसा शोधतो? संशयित बॅग किंवा बॉम्ब सदृश्य लपविलेली वस्तू श्वान कसा शोधतो? याची माहिती देण्यात आली़ तसेच अनोळखी व्यक्तीकडून दिलेले अन्न श्वान नाकारतो तेच अन्न श्वान हस्तकाकडून तो कसा स्वीकारतो, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ श्वानाचे कार्य, त्याला होणारे आजार, त्यांना देण्यात येणारा सकस आहार या विषयीची माहिती देण्यात आली़पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आऱ, उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, मारोती बुधवारे, संतोष वाव्हळ, सीता वाघमारे, शिवाजी काळे, प्रवीण घोंगडे, अमोल सिरसकर, प्रेमदास राठोड, साहेब ताटेवाड, रामचंद्र जाधव, मनोहर लोखंडे, लखनसिंह ठाकूर, इनामदार, महारुद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक गणेश रोहिरे, वर्धेकर, लिंबाळकर यांची उपस्थिती होती़ यावेळी झालेल्या प्रात्यक्षिकात श्वान जॉनी, पंच (डाबरमॅन), रिओ, ओरियन, ब्रुनो (लॅब्राडॉर) या श्वानांनी सहभाग नोंदविला़पोलिसांची जनजागरण मोहीम४परभणी- महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांच्या वतीने ६ जानेवारी रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली़ पोलीस दलातील दहशतवादविरोधी कक्ष, शहर वाहतूक शाखा आणि सायबर सेलच्या वतीने वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम घेण्यात आला़४शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक गजेंद्र सरोदे व प्रशांत वाव्हुळे यांनी वाहतुकीचे नियम तसेच ट्रॅफिक सिग्नल नियमांची माहिती दिली़ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली़ दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती या कक्षाचे भारत नलावडे, दयानंद पेटकर यांनी दिली़४सायबर सेलचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी सायबर क्राईमची माहिती देत असताना सोशल मिडीयाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ पोलीस विभागाच्या वतीने रायझिंग डे का साजरा केला जातो, या विषयीची माहिती तसेच पोलीस विभागाच्या वतीने चालणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यात आली़ कार्यक्रमास प्रा़ लासीनकर, ओव्हाळ, पाटील, हत्तीअंबिरे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसdogकुत्रा