शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परभणी : जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जागविल्या निष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:08 AM

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा जागविल्या जात असून, प्रचाराच्या रणधुमाळीत योगदान देण्यासाठी त्यांना साकडे घातले जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा जागविल्या जात असून, प्रचाराच्या रणधुमाळीत योगदान देण्यासाठी त्यांना साकडे घातले जात आहे़परभणी लोकसभा मतदार संघात यावेळेस चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे़ शिवसेना-भाजपाकडून खा़ संजय जाधव दुसऱ्यांदा मैदानात उतरले असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर निवडणूक लढवित आहेत़ या शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ़ राजन क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ अन्यही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा २९ मार्च हा शेवटचा दिवस आहे़ त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात अंतीम उमेदवारांची निश्चिती होणार आहे़ असे असले तरी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याने त्यांच्यातच तूल्यबळ लढती होणार असल्याची चर्चा सुरू आहे़ या प्रमुख उमेदवारांकडून आता जुन्या कार्यकर्त्यांचा शोध घेतला जात आहे़ शिवाय त्यांच्याशी संपर्क साधून दुभंगलेली मने जुळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे़ आतापर्यंत दुर्लक्षित राहिेलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये पक्षनिष्ठा जागविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे़ त्यामध्ये काही ठिकाणी यश येत आहे़ तर काही ठिकाणी वरवरचा होकार देऊन प्रचारात सहभागी होत असल्याचा आव कार्यकर्ते व नेत्यांमधून आणला जात आहे़ त्यामुळे निष्ठा जागविलेले जुने कार्यकर्ते खरेच प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत की नाही? याची पडताळणी मतदानानंतर मतदान यंत्र उघडल्यानंतरच समोर येणार आहे़सद्यस्थितीत मात्र स्वपक्षीय नाराजांची मनधरणी करून त्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कसरत उमेदवार व समर्थकांमधून केली जात आहे़ स्वकीयांबरोबरच इतर पक्षामध्ये असलेले मैत्रीचे संबंधही उजागर करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून निवडणूक निमित्ताने सुरू आहे़स्टार प्रचारकांची जिल्ह्याला प्रतीक्षालोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याकरीता ४० स्टार प्रचारकांची नियुक्ती केली आहे़ त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, फौजिया खान आदींचा समावेश आहे़ २६ मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेत स्वत: अध्यक्ष पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील, टोपे, फौजिया खान यांची उपस्थिती होती़ स्टार प्रचारकांच्या यादीमधील अजित पवार, छगन भुजबळ, सुषमा अंधारे, शब्बीर विद्रोही, डॉ़ अमोल कोल्हे, चित्रा वाघ आदी दिग्गज वक्ते परभणीत आलेले नाहीत़ त्यामुळे त्यांची मतदारांना प्रतीक्षा आहे़ शिवसेनेने २० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत़ त्यामधील एकही स्टार प्रचारक अद्याप परभणी मतदार संघात आलेला नाही़ त्यामुळे शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा़ संजय राऊत, दिवाकर रावते, आदेश बांदेकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नीलम गोºहे आदी स्टार प्रचारकांची मतदारांना प्रतीक्षा लागली आहे़ या दोन प्रमुख उमेदवारां व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे प्रमुख खा़ असदोद्दीन ओवीसी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, राजीव सातव, भालचंद्र मुणगेकर, हरिभाऊ राठोड आदींचीही मतदारांना प्रतीक्षा आहे़ तसेच भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी दिग्गज नेत्यांचीही जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक