लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सातही केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये पोलीस संरक्षणात ठेवण्यात आल्या आहेत.विधान परिषदेच्या परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी २१ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. परभणी व हिंगोली जिल्ह्यात एकूण ७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदानानंतर प्रत्येक केंद्रावरील एक मतपेटी अशा सात मतपेट्या सीलबंद करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही लावला आहे. पोलीस प्रशासनाला दोन दिवस या मतपेट्यांची सुरक्षा करावी लागणार असून त्यानंतर २४ मे रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी केंद्रावर मतपेट्या आणून प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार आहे.दिवस-रात्र बंदोबस्तजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील कक्षातच मतपेट्या ठेवल्या आहेत. या स्ट्राँग रुमच्या बाहेर दिवसरात्र पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. चार सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिफ्टनुसार या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली आहे.
परभणी : पोलीस संरक्षणात ठेवल्या मतपेट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:10 AM