लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.२०१८- १९ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण बँकेने आतापर्यंत ६७ हजार शेतकºयांना ३५० कोटींच्या जवळपास पीककर्ज वाटप केले होते. ज्याची टक्केवारी २३.१५ टक्के होती; परंतु, २०१९-२० हा खरीप हंगाम जवळपास संपत आलेला आहे.रब्बी हंगामाची चाहूल लागलेली आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, अद्यापपर्यंत केवळ ५० हजार शेतकºयांना २३० कोटी १३ लाख रुपयांच्या जवळपास पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्याची टक्केवारी १६ टक्के एवढी आहे.त्यामुळे मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांनी खरीप हंगामातील पेरणीही उसणवारी करुन पूर्ण केली आहे. उसणवारी केलेले पैसे परतफेडीसाठी शेतकºयांकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, पीक कर्ज वाटप करताना कर्जमाफीचाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याने बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्याची गती खरीप हंगाम संपत आला तरी अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.
परभणी : ‘पीक कर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:25 AM