लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्लास्टिक बंदीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनानेही कारवाईयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सेलूत प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टीकच्या पुष्पगुच्छावरुन संताप व्यक्त केल्याने आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सेलूकरांचे लक्ष लागले आहे.शहरातील हातगाड्यांवर फळे व भाजीपाला विक्रेते ग्राहकांना कॅरीबॅग सर्रासपणे देत आहेत. मोठे व्यापारी लग्न आणि इतर समारंभात वापरात येणाऱ्या प्लॅस्टिक पत्रावळी, ग्लास आदी साहित्य आजही आपल्या दुकानात ठेऊन ग्राहकांना विक्री करतात.वास्तविक पाहता प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे नगरपालिकेचे काम आहे. सुरुवातीच्या काळात नगरपालिकेने शहरातील किरकोळ प्लॅस्टिक विक्री करणाºया छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करीत दंड वसूल केला. शहरातील प्लास्टिक विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लोकप्र्रतिनिधींमध्ये जाणवला आहे. त्यामुळे कारवाई केली तर त्यात सत्ताधारी मंडळीचा हस्तक्षेप होतो. शेवटी कारवाई करणाºया पालिका कर्मचाऱ्यांना तोंडघशी पडावे लागते. या कारणातून सेलू शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची खंत नागरिकांना आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहीम गतीमान करून नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आजही शहरात नियमित स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी साचणाºया कचºयाचे ढीग नष्ट करण्यात पालिकेने यश मिळविले. मात्र प्लास्टिकसारख्या विषयावर नगरपालिका प्रशासन कचखाऊ भूमिका का घेते? हे समजणे अवघड झाले आहे.दररोजच्या कचºयामध्ये कॅरीबॅग आणि बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा भरणा पालिकेला आढळून येतो. म्हणूनच बंदी असूनही शहरात प्लॅस्टिक येते कोठून? असा प्रश्न खुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच उपस्थित केला. त्यामुळे येत्या काळात याचे उत्तर नगरपालिका प्रशासन कारवाई करून देते की? गुळगुळीत उत्तरे देऊन वेळकाढू धोरण अवलंबिले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, प्लॅस्टिक वापराचा सर्वाधिक त्रास नगरपालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाºयांना आहे, असे असतानाही राजकारणासाठी कारवाई करून रोष नको? या भूमिकेतून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.निर्णयाचे भान न ठेवल्यानेच संताप४शेतकरी विमा मदत केंद्राचे उद्घाटन आणि शेतकºयांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम सेलू दौºयावर आले होते. त्यांच्या स्वागतसाठी प्लास्टिकमध्ये असलेले पुष्पगुच्छ संयोजकांनी पुढे केले आणि कदम यांच्या रागाचा पारा चढला.४राज्यात प्लास्टिक वापरास बंदी असताना प्लास्टीकचे पुष्पगुच्छ समोर ठेवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी असणाºया नेत्यांना आणि तहसीलदार बालाजी शेवाळे यांना कदम यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शहरात सहजपणे मिळणारे प्लास्टिक थेट ज्या मंत्र्यांनी बंदी घातली त्यांचाच समोर आणण्याचे भान देखील कार्यकर्त्यांना कसे राहिले नाही? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.