लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत कामकाज केले जाते. व्यापारी आणि शेतकºयांमधील दुवा म्हणून बाजार समित्यांकडे पाहिले जाते. आतापर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डात स्थानिक व्यापाºयांच्या उपस्थितीत लिलाव होऊन शेतमालाची विक्री होत होती. राज्यशासनाने या प्रक्रियेला व्यापक रुप दिले असून आॅनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व बाजार समित्यांचा अंतर्भाव करुन आॅनलाईन मार्केट शेतकºयांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ई-नाम ही कार्यप्रणाली सुरु केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळांतर्गत ई-नामचे कामकाज चालविले जात आहे. पहिल्याच टप्प्यात परभणी जिल्ह्यातील परभणी आणि सेलू या दोन बाजार समित्यांचा ई-नाममध्ये समावेश झाला आहे. अधिकाधिक शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने शेतमालाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने ई-नाम प्रक्रिया राबविली जात असून बाजार समितीअंतर्गत ई-नाम कार्यप्रणालीतूनच काम करणे बंधनकारक केले आहे. त्यात शेतकºयांची नोंद घेणे, व्यापाºयांची नोंदणी करणे, आलेल्या मालाची गेट एंट्री, ई-आॅक्शन, ई-पेमेंट अशी कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष ई-नामच्या कामकाजाला सुरुवात झाली. बाजार समिती परिसरात ई-नामचा स्वतंत्र कक्षही सुरु करण्यात आला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत साधारणत: ५० हजार शेतकरी बाजार समितीत कृषी मालाची विक्री करतात; परंतु, प्रत्यक्षात केवळ ९ हजार ६६२ शेतकºयांचीच ई-नाममध्ये नोंदणी झाली आहे. शेतकºयांनी ई-नाममध्ये नोंदणी करताना सातबारा, बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणीलाच धिमा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.९८ टक्के शेतमालाचे ई-आॅक्शनपरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात ५ हजार ६४१ क्विंटल धान्याची ई-नाम प्रणालीत आवक झाली. ई-नाम प्रणालीमध्ये केलेल्या कामकाजाला लगेच शेरा दिला जात आहे. त्यात झालेल्या आवकपैकी २ हजार ४२९ क्विंटल शेतमालाची ईन-गेट एंट्री नोंदविण्यात आली. हे काम ४३ टक्के झाले असून ते साधारण असल्याचा शेरा पणन मंडळाने दिला आहे. तर ईन-गेट एंट्री व ई- आॅक्शनमध्ये ९८ टक्के काम झाले असून या कामास उत्कृष्ट असा शेरा मिळाला आहे. इनगेट एंट्री व प्रयोगशाळा अहवालातही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. शेतमालाच्या एका लॉटसाठी तीन बिडस्साठीही उत्कृष्ट शेरा मिळाला आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये बाजार समितीने ४६ टक्के शेतकºयांना ४१ लाख ५७ हजार रुपये ई-पेमेंट केले असून हे काम साधारण असल्याचे पणन मंडळाचे म्हणणे आहे.
परभणी बाजार समिती;केवळ साडेनऊ हजार शेतकऱ्यांचीच नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:36 AM