लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला.शहरातील शनिवार बाजार भागातून निघालेला हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशनरोड मार्गे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. त्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चेकऱ्यांना जिल्हाध्यक्ष प्रा.प्रवीण कनकुटे, डॉ.धर्मराज चव्हाण, जाकेर कुरेशी, गणपत भिसे, शेख अखिल, वंदना जोंधळे आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यामध्ये रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांची निवड करताना २०११ च्या जनगणनेची अट रद्द करावी व सर्वांना लाभ द्यावा, शहरातील कॅनॉल परिसरातील ४० वर्षापासून वस्ती करुन राहत असलेल्या नागरिकांना संबंधित जागा त्यांच्या नावे करुन देण्यात यावी, रमाई घरकुलच्या लाभार्थ्याना कमी दरात वाळू उपलब्ध करुन द्यावी, २०२१ च्या जनगणनेत ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी, २०१९ च्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, मागासवर्गीय कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा आदेश काढावा, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अॅड.इम्तियाज खान, डॉ.भारत भाग्यवंत, अविनाश बर्वे, संतोष पवार, भगवान देवरे, सुमित जाधव, लिंबाजी उजगरे, शेषराव जल्हारे, मुंजाजी लजडे, बी.आर.आव्हाड, मो.शफीक, स. रुस्तुम, मिलिंद कांबळे, राहुल गायकवाड, सिद्धार्थ सावंत, डॉ.प्रवीण खरात, दिलीप मोरे, एन.जी.खंदारे आदींची उपस्थिती होती.
परभणी : भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:37 AM