लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़राज्यातील दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही पथदर्शी योजना राबविली़ या योजनेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांना एकत्रित करून त्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली़ काही कामे लोकसहभागातून तर काही कामे शासनाच्या निधीतून केली जात आहेत़ जिल्ह्यामध्ये या योजनेचा चौथा टप्पा सुरू आहे़ मात्र इतर योजनांप्रमाणेच जलयुक्त शिवार योजनेलाही प्रशासकीय उदासिनता कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षे जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे झाली असली तरी या योजनेचा परिणाम मात्र दिसून येत नाही़ जिल्ह्यात सद्यस्थितीला तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये कामांना मंजुरी देण्यात आली; परंतु, प्रत्यक्षात ही कामे पूर्ण करण्यापूर्वीच बिले उचलण्याचा प्रकार झाल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे़पूर्णा तालुक्यात २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ३१ मार्च २०१८ अखेर वझूर, लिमला, दस्तापूर, शिरकळस, एरंडेश्वर, आहेरवाडी, धानोरा काळे, नावकी, बलसा, मजलापूर या गावांमध्ये ढाळीच्या बांधाची कामे करण्यात आली़ या संदर्भात कृषी सहाय्यकांकडे विचारणा केल्यानंतर आम्ही कामे केलीच नाहीत़ या कामांबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, असे कृषी सहाय्यक सांगत आहेत़ कृषी सहाय्यकांना जर ढाळीच्या बांधाच्या कामांविषयी माहिती नसेल तर ही कामे कोणी केली? असा प्रश्न निर्माण होत असून, कामे न करताच बोगस बिले तयार करून शासनाचा निधी गिळंकृत करण्यात आला़ त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे़ जलयुक्त शिवार या महत्त्वकांक्षी प्रकल्पातही जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार होत असल्याने ज्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली तो उद्देशच सफल होत नाही़ प्रत्यक्षात कामे न करताच बिले उचलण्याचा प्रकार निदर्शनास आला असून, या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, दत्तराव मुळे, ब्रह्मानंद सावंत, गणेश देशमुख, शिवाजी गमे, अंकुश देशमुख, मधुकर वरकड, नारायण आळसे, अंजानराव मुंडे आदींनी केली आहे़अल्प काळात कामे : झालीच कशी?४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ढाळीच्या बांधांचे बिले उचलण्यात आली आहेत़ ही बिले उचलताना कालावधी मात्र कमी दाखविण्यात आला आहे़ मार्च महिन्यामध्ये कामे उरकून घेण्याची गडबड असल्याने बिले सादर करताना एका दिवसांच्या फरकातच कामाला मंजुरी आणि काम पूर्ण केल्याचेही दाखविण्यात आले आहे़ ढाळीचे बांध बांधण्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो़ परंतु, अनेक बिलांचे अवलोकन केले असता, यापेक्षा कमी कालावधीत काम पूर्ण झाल्याचे दाखविले जात आहे़ त्यामुळे या कामांविषयी शंका उपस्थित होत असल्याचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले़आकस्मीक खर्चातून लाखोंचा गैरव्यवहारढाळीच्या बांधाचे बिले उचलत असताना कृषी विभागाकडून आकस्मीक खर्च व देखरेख खर्चाच्या नावाखाली रक्कम उचलण्यात आली आहे़ हा आकस्मीक खर्च नेमका काय आहे ? असा सवाल उपस्थित होत असून, या प्रकाराचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़अनेक प्रश्न अनुत्तरितच४पूर्णा तालुक्यातील काही गावांमध्ये ढाळीचे बांध ही कामे झाली नाहीत़ या संदर्भात कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांनी आम्ही कामे केली नाहीत, असे तालुका कृषी अधिकाºयांना लेखी सांगितले आहे़ तसेच उपविभागीय कृषी अधिकाºयांनाही या संदर्भात पत्र पाठविण्यात आले़ त्यामुळे जर कृषी सहाय्यकांनी कामे केली नसतील तर ही कामे कोणी केली? याची तपासणी होणे अपेक्षित होते़ परंतु, कामांची तपासणी न करताच निधीचे वितरण कसे काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे़ त्यामुळे अधिकाºयांविषयीही संशय निर्माण झाला असून, जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़
परभणी : कामे न करताच उचलली लाखोंची बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:03 AM