शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:02 AM

प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़जिल्हाभरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागात समाधान शिबीर घेण्यात येत आहे़ आॅनलाईन सातबाराचे वाटप, निराधार योजनेचा लाभ, ग्रामविकास विभागाकडून दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, जॉबकार्डचे वाटप, मागेल त्याला शेततळे उपक्रमांतर्गत शेततळयांचे कार्यारंभ आदेश वितरण करणे आदींसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते़ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी जिंतूर व सेलू येथे हे शिबीर घेण्यात आले़ याशिवाय परभणी येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या संदर्भात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे़ बुधवारी जिंतूर, सेलूत झालेल्या समाधान शिबिरासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे या अधिकाºयांसह माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींची फारशी उपस्थिती नव्हती़ व्यासपीठावर मात्र भाजपाच्याच कार्यकर्त्यांची रेलचेल होती़ दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत भाजपाचा पक्षीय अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांकडून केला जात आहे़ विशेष म्हणजे या शिबिराला स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़ त्यामुळे या शिबिराच्या आयोजना संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत़ सर्व ठिकाणच्या शिबिरांमध्ये पाणीपुरवठा मंत्री लोणीकर हे भाजपा सरकारचेच गुणगान करीत आहेत़ यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करणे ही दुर्दैवाची बाब आहे, असेही विरोधकांचे म्हणणे आहे़ भाजपा नेत्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार करीत जनहितांच्या कामांसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे सांगून विरोधकांनी यात राजकारण करू नये, असा सल्लाही दिला आहे़जनहितासाठी समाधान शिबीर-अभय चाटेजनतेचा फायदा व्हावा, या उद्देशातून समाधान शिबिराचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे़ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी स्तरावर मर्यादा येतात़ या उलट या शासकीय योजनांची अधिक जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनातून भाजपाचे पदाधिकारी काम करीत आहेत़ सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या चांगल्या कामांचा हा एक भाग आहे़ विरोधकांनी नाहक राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी दिली़सरकारी यंत्रणेचा भाजपाकडून गैरवापर- विजय भांबळेराज्यातील भाजपा सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे़ जिल्ह्यातही तशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे़ आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही या शिबिराचे निमंत्रण दिले गेले नाही़ पक्षीय अजेंडा या शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक झाली़ नरेगाच्या एकाही कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे रोजगारासाठी जिंतूर तालुक्यातील जवळपास २० हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत़ हा प्रश्न सोडविण्याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही़ पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे़ परंतु, त्याचे एकही काम मंजूर नाही़ त्यामुळे भाजप सरकारच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असा आरोप आ़ विजय भांबळे यांनी केला़भाजपाकडून जनतेची दिशाभूल- राम खराबेसेलू व जिंतूर येथे झालेल्या समाधान शिबिरासाठी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही़ योजनांच्या नावाखाली भाजपाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे़ जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी लोणीकर हे भाजपाचीच महती या शिबिरातून सांगत आहेत़, ही दुर्दैवी बाब आहे़ जिल्हाधिकारी, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पक्षीय अजेंडा राबविणे हे चुकीचे आहे़, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिंतूर विधानसभाप्रमुख तथा जि़प़तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी दिली़