लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आर्थिक परिस्थितीमुळे बैलजोडी घेण्यासाठी पैसे नसल्याने दोन मुलीच्या खांद्यावर जू ठेवून पेरणी करणाºया शेतकºयाला भाजपाचे महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी शुक्रवारी बैलजोडी भेट दिली.परभणी तालुक्यातील पिंगळी गावातील बाबुराव राठोड यांनी एका संस्थानची पाच एकर जमीन यंदा ठोक्याने घेतली आहे. पत्नी, पाच मुली, एक मुलगा असा कुटुंबाचा गाडा ओढताना राठोड यांची दमछाक झाली होती. त्यांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केल्यानंतरही चरितार्थ भागविणे कठीण जात होते. म्हणून त्यांनी ठोक्याने शेती करण्याचा निर्णय घेतला; परंतु, त्यांच्याकडे बैलजोडी नसल्याने व आर्थिक तंगीमुळे नवीन खरेदी करणे शक्य नसल्याने पेरणीचे काम दोन मुलींच्या खांद्यावर जू ठेवून करावे लागले. औतालाच त्यांनी दोन्ही मुलींना जुंपल्याची माहिती समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यानंतर भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी राठोड कुटुंबियांची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम रद्द करुन त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश यापुर्वीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुर्पूद केला होता; परंतु, राठोड कुटुंबियांची माहिती समजल्यानंतर त्यांनी या कुटुंबियांना बैलजोडी घेऊन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी नवी बैलजोडी बाबुराव राठोड व लक्ष्मी राठोड या दाम्पत्याला एका कार्यक्रमात दिली. यावेळी लिंबाजी गरुड, अजीत गरुड, गोपाळ गरुड, संतोष गरुड, बालाजी गरुड, महेश गरुड, भागवत गरुड, श्रीनिवास गरुड, त्र्यंबक गरुड, नागेश गरुड, रामेश्वर चाफाकानडे, आदिनाथ दामोधर, हरिभाऊ आगलावे, दत्ता पोफळे, बाळासाहेब सावंत आदींची उपस्थिती होती.
परभणी : भाजपाने शेतकऱ्याला भेट दिली बैलजोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:30 AM