लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाचनाने विचार प्रगल्भ होतात़ त्याचबरोबर पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते़ त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ अशोक ढवण यांनी केले़विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या वैद्यनाथ पदव्युत्तर वसतिगृहात २६ एप्रिल रोजी डॉ़ ढवण यांच्या हस्ते अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन झाले़ या प्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, प्राचार्य डॉ़ धर्मराज गोखले, विभागप्रुमख डॉ़ पी़ आऱ झंवर, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ़ राजेश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी अभिनव काटे यांची प्रमुख उपस्थिती होती़कुलगुरु डॉ़ ढवण म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीसाठी जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे़ काही विद्यार्थ्यांमध्ये अपयशाने नैराश्य येते़ अशा वेळी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, कोणताही शॉर्टकट शोधू नये, जीवनात चढ-उतार येत असतात़ पराभवातच उज्ज्वल आयुष्याच्या संधी दडलेल्या असतात, हे लक्षात ठेवावे़, असे सांगितले़ यावेळी शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले़या प्रसंगी दीड लाख पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तक कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले़ प्राचार्य डॉ़ धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले़ समाधान चोपडे यांनी सूत्रसंचालन केले़ स्वप्नील भोसले यांनी आभार मानले़
परभणी : पुस्तके वाचनातून पराभव पचविण्याचे सामर्थ्य लाभते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:10 AM