शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

परभणी : ट्रॅक्टरसह दीड एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:26 AM

तालुक्यातील देवेगाव येथील एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यातील देवेगाव येथील एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील शेतकरी विकास राधाकिशन गलबे यांनी आपल्या तीन एकरामध्ये ऊस पीक घेतले होते़ सध्या हे पीक काढणीला आल्याने उसाची तोडणी करून आष्टी येथील समृद्धी कारखान्याकडे हा ऊस गाळपास जात होता़ विशेष म्हणजे दीड एकरवरील ऊस तोडणी करून त्याचे गाळपही झाले आहे; परंतु, उर्वरित क्षेत्रावरील ऊस तोडून ट्रॅक्टरमध्ये भरीत असताना ट्रॅक्टरला अचानक लाग लागली़ या आगीमध्ये ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाला़ आग लागल्याची घटना कळताच पाथरी येथील अग्निशमन दलाला कळविले़ या अग्निशमन दलाने बंबाच्या सहाय्याने ही आग विझवून आटोक्यात आणली़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून ऊस उत्पादकाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे़