लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरु करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात बाजार समितीत ९ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलावा प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात लिलाव सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती गंगाधरराव कदम यांच्या उपस्थितीत मंळवारी बैठक पार पडली. बैठकीस उपसभापती पंकज आंबेगावकर, सचिव बालासाहेब कदम, संचालक ज्ञानेश्वर मोरे, बाबासाहेब अवचार, प्रभाकर जाधव, व्यापारी संजय लड्डा, रामनिवास सारडा, जुगल काबरा, विजय पोरवाल, बाळू बांगड, रहीम भाई, पंकज लाहोटी, राधाकिशन शिंदे, दामोदर बांगड, महेश कोक्कर, नितीन कत्रुवार, गंगाधर मोरे, राजू काबरा, प्रतीक मंत्री, संजय यादव, बापूराव चिंचलवाड, नितीन लाहोटी यांची उपस्थिती होती. बैठकीत लिलावाची पद्धत, नियोजन या संदर्भात चर्चा करण्यात आली. हळदीचा लिलाव सुरु करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतल्याने परभणी जिल्ह्यातील हळद उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.लिलाव प्रक्रियेसाठी अभ्यास दौरा४हळदीचा लिलाव कसा होतो, या बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी बाजार समितीने ११ एप्रिल रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. या अभ्यास दौºयात सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, सचिव बालासाहेब कदम, आडत व्यापारी सहभागी होणार आहेत. या दौºयात कुरुंदा, वसमत, हिंगोली, सांगली येथील बाजार समितीला भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे.बाजार समितीत पुरेशा सुविधा उपलब्ध असल्याने हळदीचा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभरात मानवत बाजार समितीत हळदीचा लिलाव सुरु होईल.- गंगाधरराव कदम, सभापती कृ उ बा
परभणी : मानवतमध्ये होणार हळद खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:45 PM