शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

परभणी : पोटनिवडणुकीत दिग्गज उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:42 AM

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, विजयी उमेदवारांची गावा-गावांतून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, विजयी उमेदवारांची गावा-गावांतून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला़गंगाखेड तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी पोट निवडणूक झाली़ ९ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोट निवडणूक जाहीर झाली़ त्यानंतर गौळवाडीतील ४, नरळद १, सेलमोहा १ अशा सहा जागा बिनविरोध आल्या़ तर पिंपळदरी, सुप्पा येथील रिक्त जागांसाठी अर्ज आले नाहीत़ त्यामुळे मैराळ सावंगी, सुप्पा ज़, खादगाव, धारासूर या चार ग्रामपंचायतमधील प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली़मैराळ सावंगी येथे राजेश्वर नरहरी पांचाळ यांनी २१५ मते घेत विजय संपादन केला़ सुप्पा येथे सावित्रा पांडूरंग बचाटे (२७८), धारासूर येथे मंगलबाई उत्तमराव गवडे (३३५), खादगाव येथे गोपाळ गम्पू गुट्टे (२५७) हे उमेदवार विजयी झाले़ तहसीलदार जीवराज डापकर, नायब तहसीलदार विजय दावणगावकर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली़ मतमोजणीसाठी एस़पी़ डाके, दत्तराव बिलापट्टे, किरण साखरे यांनी सहकार्य केले़ निवडणूक निर्णय अधिकारी बी़ आऱ उकंडे, पी़टी़ राठोड यांनी निकाल जाहीर केला़जिंतूरमध्ये राकाँचे वर्चस्वपोट निवडणुकांमध्ये आ़ विजय भांबळे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे़ जिंतूर तालुक्यात १७ जागांसाठी निवडणूक लागली होती़ पाच जागांवर उमेदवारी अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या़ उर्वरित बारा जागांपैकी ५ जागा बिनविरोध आल्या़त्यात संगळेवाडी, साखरतळा, मानमोडी, नांगणगाव येथील प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले़ उर्वरित सात जागांसाठी निवडणूक झाली़ त्यात मारवाडी येथील चार पैकी ३, बोरी १, चारठाणा १, घागरा १ अशा सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत़ सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा आ़ विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़चारठाण्यात मीरा निकाळजे विजयी४चारठाणा- येथील प्रभाग १ च्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना नानासाहेब निकाळजे या २१४ मतांनी विजयी झाल्या आहेत़ निकाळजे यांना ३७७ मते मिळाली असून, त्यांच्या प्रतीस्पर्धी उमेदवार अरुणा दयानंद निकाळजे यांना १६३ मते मिळाली़ मीरा निकाळजे यांच्या विजयानंतर जल्लोष करण्यात आला़ यावेळी नानासाहेब राऊत, सरपंच बी़जी़ चव्हाण, मधुकर भवाळे, उपसरपंच जलील इनामदार, दशरथ चव्हाण, नानासाहेब निकाळजे, प्रसादराव भांबळे, वाजेद कुरेशी आदींची उपस्थिती होती़परभणी तालुक्यातील निकाल घोषिततालुक्यातील ताडपांगरी येथील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कालिंदाबाई मंचकराव वैरागर या विजयी झाल्या आहेत़ त्यांना १२६ मते मिळाली तर त्यांचे प्रतीस्पर्धी उमेदवार कलावती कांबळे यांना ८४ मते मिळाली आहेत़ करडगाव ग्रामपंचायतीत नारायण मदनराव खिस्ते १९४ मते घेऊन विजयी झाले़ त्यांचे प्रतीस्पर्धी दत्ता मुंडे यांना ६३ मते मिळाली़ दैठणा येथील एका जागेच्या पोट निवडणुकीत आबाराव बालासाहेब कच्छवे हे २७१ मते घेऊन विजयी झाले़ त्यांचे प्रतीस्पर्धी भागवत मुंजाजी कच्छवे यांना १३५ मते मिळाली़ या पोट निवडणुकीसाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ परभणी तालुक्यातील जोड परळी येथे प्रसाद काळे, टाकळगव्हाण ग्रामपंचायतीत सुरेखा दीपक पितांबरे, कुंभारी ग्रामपंचायतीत रेखा पांडूरंग जुंबडे, बलसा खुर्द ग्रा़पं़ दोन जागांसाठी जिजाराव विठ्ठलराव शिंदे आणि गंगासागर उत्तम शिंदे असे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले़बोरीत गणेश चौधरी विजयीबोरी-बोरी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश चौधरी ४९१ मते घेऊन विजयी झाले आहेत़ विजयी उमेदवाराची गावातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी जि़प़ गटनेते अजय चौधरी, माजी सभापती अशोकराव चौधरी, पं़स़ सदस्य सुभाष घोलप, सरपंच सखाराम शिंपले, शशिकांत चौधरी, विजयकुमार चौधरी, रामकिशन निवळकर, सतीश चौधरी आदींची उपस्थिती होती़राकाँचे पुन्हा वर्चस्वताडकळस येथील प्रभाग ३ मधील पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जागा कायम ठेवत वर्चस्व प्रस्थापित केले़ प्रभाग ३ मधील ग्रा़पं़ सदस्य इंदूबाई गणेशराव अंबोरे या जि़प़ सदस्य म्हणून निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली होती़ २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोट निवडणुकीत तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ बुधवारी निकाल जाहीर झाला़ त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीलाबाई जनार्धन अंबोरे या ४२८ मते घेऊन विजयी झाल्या़