शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

परभणी : २ कोटी रुपयांवर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ): शासकीय दूध योजनेंतर्गत खरेदी केलेल्या दुधाचे सात कोटी रुपये अनुदान थकीत असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शासकीय दूध योजनेंतर्गत खरेदी केलेल्या दुधाचे सात कोटी रुपये अनुदान थकीत असताना राज्य शासनाने २ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे़ अद्यापही सव्वा महिन्याचे ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळणे बाकी आहे़ दूध खरेदीचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने शासनाच्या धोरणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ याचा सर्वाधिक फटका पाथरी तालुक्याला बसत असल्याचे समोर येत आहे़पाथरी तालुक्यात सुपिक जमीन असून, सुरुवातीपासून या तालुक्यात जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे प्रमुख सिंचनाचे स्त्रोत आहे़ या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उसाची शेती होऊ लागली़ या पाण्यावर वाढणाºया उसाच्या क्षेत्रामुळे आपोआपच या भागात चाराही उपलब्ध होवू लागला़ २००६ नंतर गोदावरीच्या पात्रात उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले़ त्यामुळे गोदाकाठच्या क्षेत्रातही शेती सोबत शेती पूरक व्यवसायही वाढत गेला़ गोदाकाठचा शेतकरी त्यातून समृद्ध झाला़ २००५ पासून या तालुक्यात शेतकरी संकरित गायी खरेदी करून शासकीय दूध संकलन केंद्रावर दुधाचा पुरवठा करू लागला़ हळूहळू दूध संकलनात मोठी वाढ झाली़ २०१५ पासून शेतकऱ्यांचा कल दूध व्यवसायाकडे अधिक वाढला गेला़ शेतकरी बँकांकडून तसेच दूध संस्थांच्या हमीवर अर्बन बँकांकडून मोठ्या प्रमाणावर गायींची खरेदी करू लागले़ पाथरी तालुक्यात मागील तीन वर्षांत दूध व्यवसाय झपाट्याने वाढ गेला़ एकेकाळी शासकीय दूध संकलन केंद्रावर केवळ २ हजार लिटर दूध खरेदी व्हायचे, ते आता ३० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे दूध उत्पादकांच्या हातात दररोज नगदी पैसे येत आहेत़ दूध विक्री केल्यानंतर १० दिवसांत शेतकºयांच्या हातात पैसे पडत असल्याने शेतकºयांचे व्यवहार सुरळीत चालू लागले़ मात्र मागील सहा महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असतानाही दुधाचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला गेला़ शासकीय दूध संकलनाचे ७ कोटी रुपये थकीत अनुदान मिळविण्यासाठी दूध उत्पादक संस्थांनी आ़ मोहन फड यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावाही केला़ मात्र शासनाकडून केवळ २ कोटी रुपये जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे मागितले ७ कोटी तर मिळाले २ कोटी अशी अवस्था निर्माण झाली आहे़ शासनाच्या धोरणामुळे दूध उत्पादक शेतकºयांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे़१० दिवसांना लागते तीन लाखांचे अनुदानच्पाथरी तालुक्यात दूध संकलन वाढत गेल्याने दूध उत्पादन संस्था मजबूत होतील, असे वाटत होते़ मात्र दीड महिन्यांचे अनुदान थकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत़च्पशूंसाठी लागणारा चारा, पेंड, सुग्रास आणण्यासाठी संस्था मदत करू शकत नाहीत़ आणि शेतकºयांच्या हातात पैसे नाहीत, अशी दुहेरी अडचण निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे १ हजार लिटरपेक्षा अधिक प्रतिदिन दूध संकलन करणाºया संस्थेला १० दिवसांला ३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करावे लागते़च्परभणी जिल्ह्यात शासकीय दूध खरेदीमध्ये पाथरी दूध संकलन केंद्रात २७ हजार लिटर दूध संकलन होत होते़ मात्र दुष्काळ व शासनाच्या आडमुठेपणा याचा फटका दूध संकलनाला बसला असून, सध्या २१ हजार लिटरच दूध संकलन होत आहे़शेतकरी या व्यवसायाकडे वळत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला़ शेतकºयांनी कर्ज काढून गायी खरेदी केल्या़ मात्र शासनाकडून दूध अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शासनच हा व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे़-विठ्ठल गिराम, साई दूध उत्पादक संस्था, बाभळगावशासनाकडून वेळेत अनुदान मिळत नसल्याने शेतकºयांना पैशाची आवश्यकता असूनही रक्कम देता येत नाही़ संस्था अडचणीत सापडल्या आहेत़ असेच धोरण सुरू राहिले तर संस्थेला टाळे ठोकावे लागतील़-एकनाथ घांडगे, जिजाऊ दूध उत्पादक संस्था, पाथरगव्हाण बु़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधfundsनिधी