शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

परभणी : चक्का जाम, अर्धजलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:32 AM

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी लावून धरली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी लावून धरली.जिल्ह्यामध्ये एक आठवड्यापासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु आहे. सकल मराठा समाज आंदोलनात उतरला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने होत आहेत. पूर्णा तालुक्यात सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागात चुडावा, माटेगाव, आहेरवाडी येथे हे आंदोलन झाले.चुडावा येथे सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन केल्याने पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. माटेगाव येथेही आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून धरला.पूर्णा-झिरोफाटा या मार्गावरील वाहतूक आंदोलनामुळे विस्कळीत झाली होती. आहेरवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले. माटेगाव येथेही आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून शासनाचा निषेध नोंदविला. तसेच चक्काजाम आंदोलन केले.बोरीत मूक मोर्चाबोरी- सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सकल मराठा समाज बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहाय्यक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक व्ही.एस.खोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. विद्याताई चौधरी, आशाताई गायकवाड, मुंजाभाऊ मगर, उत्तम डोंबे, तानाजी चौधरी, कांता चौधरी, अशोकराव खापरे, शिवाजी कदम, नवनाथ कदम, राजाभाऊ देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेलूत बेमुदत ठिय्या आंदोलनसेलू येथे मराठा समाज बांधवांनी ३० जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. येथील तहसील कार्यालयासमोर सुरु केलेल्या या आंदोलनात पहिल्या दिवशी कुंडी व म्हाळसापूर येथील मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.पोखर्णी रोडवर रास्ता रोकोमानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील समाज बांधवांनी पाथरी- पोखर्णी रस्त्यावर सोमवारी सकाळी ९ वाजता रास्तारोको आंदोलन केले. मंडळ अधिकारी पंडित सुरवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक एस.व्ही. मनाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एम.शेख, वाहुळे, जाधव आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पूर्णा वकील संघाचा पाठिंबामराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास पुर्णा येथील वकील संघाने पाठिंबा दिला असून आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष जी.एन.डाखोरे, पी.एस.सोनी, आर.के. देवकते, गोविंद शिंदे, कैलास पारवे, दिनेश काळे, राजू भालेराव, सोमनाथ नागठाणे आदींची नावे आहेत.पाथरी- तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात उतरुन सोमवारी मराठा समाज बांधवांनी दोन तास अर्धजलसमाधी आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तालुक्यात १९ जूनपासून सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलनाचा आजचा ११ वा दिवस आहे. ३० जुलै रोजी मराठा समाजाच्या वतीने ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले.सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाथरी शहरापासून ढालेगावपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. समाज बांधवांनी गोदावरी नदीपात्रात उतरुन घोषणा दिल्या. एक ते दीड तास हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार एस.डी. मांडवगडे यांनी गोदावरी नदीपात्रात उतरुन निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसmarathaमराठाreservationआरक्षण