लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, प्रभारी अधिकाऱ्यांवरच प्रशासकीय कारभाराची भिस्त अवलंबून आहे़ परिणामी, विकास कामे ठप्प पडत असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयामधील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली़ त्यांच्या जागी अद्यापपर्यंत एकही अधिकारी रुजू झाला नाही़ परिणामी हे पद रिक्त आहे़ या कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे हे मागील आठवड्यात सेवानिवृत्त झाले आहेत़ त्यामुळे हे पदही रिक्त आहे़ या दोन्ही पदांचा पदभार प्रभारी अधिकाºयांमार्फत चालविला जात आहे़ तसेच तहसीलदार संवर्गातील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, महसूल विभागातील तहसीलदारांचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रभारी अधिकाºयांवर कारभार चालविला जात आहे़ जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाची परिस्थितीही अतिशय वाईट आहे़ या कार्यालयात सरकारी कामगार अधिकाºयांसह अनेक पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाºयांबरोबरच कंत्राटी कर्मचाºयांवर या कार्यालयाचा कारभार चालविला जात आहे़ सध्या नांदेड येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी ए़ए़ देशमुख यांच्याकडे या पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे़ आठवड्यातील दोन दिवस देशमुख हे परभणीतील कार्यालयाचा कारभार पाहतात़ विशेष म्हणजे त्यांच्याकडे माथाडी मंडळाचे सचिव आणि राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचाही पदभार आहे़ त्यामुळे एकूण सहा पदांचा पदभार केवळ एका अधिकाºयावर सोपविण्यात आला आहे़ या कार्यालयात किमान वेतन निरीक्षकांची चार पदे मंजूर आहेत़ त्याचप्रमाणे दुकान निरीक्षकाचे एक पद तर लिपिक आणि शिपायाचे प्रत्येकी १ पद मंजूर आहे़ मात्र त्यापैकी किमान वेतन निरीक्षक आणि दुकान निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने कंत्राटी कर्मचाºयांवर या कार्यालयाचा कार्यभार पार पाडला जात आहे़ माथाडी मंडळातही चार पदे रिक्त असून, या ठिकाणी कंत्राटी स्वरुपात कर्मचारी घेऊन या मंडळाचा कारभार चालविला जात आहे़जिल्हा दुग्ध शाळेमध्ये रिक्त पदे आणि प्रभारी कारभारामुळे कामकाज विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे़ परभणी जिल्ह्यासाठी एमआयडीसी परिसरात दुध डेअरी उभारण्यात आली आहे़ या ठिकाणी जिल्हाभरातील दुधाचे संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाते़ या दुध डेअरीचा कार्यभारही नांदेड येथील दुग्ध शाळा व्यवस्थापक विजयकुमार घुमाडे यांच्याकडे सोपविला आहे़ त्यामुळे आठवड्यातील दोन दिवस परभणीत येऊन ते येथील कारभार पाहतात़ जिल्हा दुग्ध शाळेमध्ये एकूण ६२ पदे मंजूर आहेत़ मात्र त्यापैकी ३१ पदे रिक्त आहेत़ निम्म्याच कर्मचाºयांवर या कार्यशाळेचा कार्यभार सांभाळला जातो़ दुधाचे शीतकरण करण्यासाठी रेफ्रीजीशन आॅपरेटर हे पद महत्त्वपूर्ण आहे़ या ठिकाणी तीन आॅपरेटरच्या पदांना मंजुरी असताना एकही पद भरलेले नाही़तसेच यांत्रिकी विभागात फिडर, प्लँट आॅपरेटर, डेअरी अटेंडंट ही तांत्रिक पदेही रिक्त असल्याने शिकाऊ आणि अनुभव असलेल्या अप्रशिक्षीत कर्मचाºयांकडून कामकाज करून घेतले जात आहे़ जिल्ह्यातील इतर अनेक कार्यालयांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासकीय कामकाजाची गती मंद झाली आहे़ नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत़ परिणामी प्रशासकीय कामकाजाविषयी ओरड वाढली आहे़१६ कार्यालयांत चालते प्रभारीराज४जिल्ह्यातील १६ कार्यालयात प्रभारीराज असून, या कार्यालयांचा कारभार विस्कळीत झाला आहे़ खरीप हंगामामध्ये कृषी खात्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पद रिक्त आहे़ परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालासाहेब शिंदे यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली़४तेव्हापासून हे पद रिक्त आहे़ सध्या अतिरिक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे प्रभारी स्वरुपात या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे़ याशिवाय जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी, एसटी महामंडळातील विभागीय नियंत्रक, जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी, पूर्णा नगरपालिकेतील मुख्याधिकारी रिक्त आहे़४तसेच जिल्हा भूवैज्ञानिक अधिकारी, जिल्हा प्रयोगशाळेतील अणुजीव शास्त्रज्ञ, जिल्हा रेशीम अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, अन्न व औषध कार्यालयातील अन्न निरीक्षक, जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक आदी महत्त्वपूर्ण पदांचा कारभार प्रभारी अधिकाºयांमार्फत चालविला जात आहे़महापालिकेत अधिकाºयांचा वाणवा४महानगरपालिकेतही अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत़ त्यात उपायुक्तांची एक जागा रिक्त असून, सहाय्यक आयुक्तांची पदेही रिक्त आहेत़ त्यामुळे महापालिकेचा कारभार ढेपाळला आहे़ महापालिकेमध्ये मागील पाच वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली नसल्याने अधिकाºयांची अनेक पदे रिक्त असून, मनपाचा कारभार सुरळीत करण्यासाठी ही पदे भरणे गरजेचे झाले आहे़
परभणी:प्रभारी अधिकाऱ्यांवर जिल्ह्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:30 PM