लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील कान्हेगाव येथील अविष्का वचिष्ट भंडारे या ३ वर्षाच्या मुलीला द्विदलीय ºहदय या गंभीर आजारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने २ लाख ५१ हजारांची मदत करण्यात आली आहे.बऱ्याच दिवसांपासून अविष्काची ्रप्रकृती खालावत जात होती. कुटुंबियांनी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने अडीच लाख रुपयांचा खर्च सांगितला. अविष्काचे कुटुंंब सामान्य व भूमिहीन असल्याने एवढे पैसे कोठूून आणायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. त्यातच तालुक्यातील कवी महेश कोरडे यांच्या सहकार्याने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावर ओमप्रकाश शेट्टे यांनी मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मुलीच्या उपचारासाठी संबंधितांना सूचना दिल्या व उपचारासाठी पूर्णपणे मदत करण्याचे सांगितले. ६ मार्च रोजी अविष्काची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. १२ मार्चला अविष्का हिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. या मदतीने भंडारे कुटुंबिय भारावून गेले आहे.
परभणी : चिमुकलीला मिळाली आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:18 AM