लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने २०१८-१९ च्या खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी जवळपास १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये १ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाची लागवड केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत शेंद्री बोंडअळीने यावर्षी कापसाचे क्षेत्र घटले; परंतु, ज्या शेतकºयांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. त्या शेतकºयांवर पश्चातापाची वेळ आली आहे. सध्या कापूस पीक फुल-पात्यात आहे. कापसाला बोंडे लागण्याआधीच वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकावर हल्ला चढविला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या पाहणीमध्ये शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.कापूस पिकावर झालेल्या शेंद्री बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा परिणाम कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाच्या वतीने क्रॉपसॅप अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकाची पाहणी करीत आहेत. कापूस उत्पादकांना या पाहणी दरम्यान मार्गदर्शन करुन वापरावयाची औषधी व खते याबाबत माहिती देत आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांमध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढविला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. निवडलेल्या गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने २ हजार हेक्टर क्षेत्रावर १८०० कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. या सापळ्यांच्या माध्यमातून कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.या गावांचा केला समावेशकृषी विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पायलट पथदर्शक प्लॉट अंतर्गत (क्रॉपसॅप) जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ९ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील पिंपळा, जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी, सेलू तालुक्यातील झोडगाव, मानवतमधील रामेटाकळी, पाथरीमधील झरी, गंगाखेड तालुक्यातील कौडगाव, सोनपेठ तालुक्यातील धामोनी, पालममधील पेठशिवणी तर पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या गावांचा समावेश आहे. या गावांमधील कापूस उत्पादकांच्या शेतामध्ये कृषी विभागाकडून कामगंध सापळे बसवून बोंडअळी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबद्दल नाराजीसध्या जिल्ह्यातील शेतकरी हा पाऊस व गुलाबी बोंडअळी या दोन नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झाला आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात क्रॉपसॅप अभियान राबविण्यात येत असले तरी कृषी विभागाकडून बोंडअळीचा अधिक प्रभाव गृहित धरुन जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
परभणी :बोंडअळी नियंत्रणासाठी नऊ गावांची केली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:29 AM