लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांसह विकासकामांची नामफलके कापडी आवरणाने झाकून ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील चौक आणि रस्त्यांवरील राजकीय पक्षांचे झेंडे, होर्र्डींग्ज उतरविण्यात आले आहेत.शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबई येथे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताच राज्यभरात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाबरोबरच परभणीतील महानगरपालिका प्रशासनानेही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नामफलकांना कापडी आवरण टाकण्याचे काम दिवसभर करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात मागील काही दिवसांपूर्वी विकासकामे झाली आहेत. या विकासकामांच्या भूमिपूजनांचे नामफलकेही झाकून घेण्यात आली. जिंतूर रोड, वसमतरोड आणि गंगाखेड रोडवर लावलेले पक्षांचे झेंडे, होर्र्डींग्ज काढून घेण्यात आले आहेत. परभणी शहरातील जिल्हा स्टेडियम भागात दोन दिवसांपूर्वी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते.हा नामफलकही झाकून ठेवण्यात आला आहे. शहरात अंतर्गत वसाहतींमध्येही लावलेली फलके झाकून ठेवली आहेत. ही झाकलेली नामफलके पाहताच शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याची जाणीव होत आहे.एस.टी. महामंडळ : आचारसंहितेचा पडला विसर४शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर जिल्हाभरात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका आणि तहसील प्रशासनातील अधिकारी-कर्मचाºयांनी उपाययोजना केली.४विशेष म्हणजे, एस.टी. महामंडळातील अधिकाºयांनीही राजकीय स्वरुपाचे होर्डिेग्ज, नामफलके काढून घेतली. येथील बसस्थानक परिसरात भूमिपूजनाचा नामफलक उभारला होता. हा नामफलक झाकून घेण्यात आला.४बसस्थानकावरील होर्डिग्जही काढण्यात आले; परंतु, बसगाड्यावरुन शासनाच्या जाहिरातींमध्ये राजकीय व्यक्तींचे छायाचित्र असलेल्या जाहिराती काढून घेतल्या नाहीत. त्यामुळे रविवारी देखील काही बसगाड्यावर या जाहिराती छायाचित्रासह झळकत असल्याचे पहावयास मिळाले.मतदान केंद्रांच्या दुरुस्तीचे आदेश४महापालिका प्रशासनानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत परभणी शहरातील सुमारे २०० मतदान केंद्र आहेत. २१ आॅक्टोबर रोजी या केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे या सर्वच मतदान केंद्रांच्या दुरुस्तीचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.पदाधिकाºयांच्या गाड्या जमा४आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू होताच महानगरपालिकेने लोकप्रतिनिधींसाठी दिलेल्या गाड्या जमा करुन घेतल्या आहेत. त्यात महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समितीच्या सभापतींची गाडी कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली.सिमेवर उभारली चौकी४आचारसंहिता लागताच येलदरी धरणाजवळील विदर्भ- मराठवाड्याच्या सिमेवर पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर कोरडे, पो.कॉ.मनोहर फड, गणेश बाहेती आदींची या ठिकाणी नियुक्ती केली आहे.
परभणी : राजकीय नामफलकांना घातले कापडी आवरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:21 AM