शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:10 AM

येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.परभणी शहरातील नटराज रंगमंदिर या जुन्या नाट्यगृहाची दूरवस्था झाल्याने नवीन नाट्यगृह उभारणीसाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने नाट्यगृह उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून महानगरपालिकेला हा निधी प्राप्त झाला आहे. येथील बचतभवनच्या जागेत नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिकेने नाट्यगृह उभारण्याची प्रक्रिया सुरु केली. प्रारंभी नाट्यगृहाचा आराखडा तयार करुन बांधकामाचा खर्च काढण्यात आला. एकूण १६ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला असून राज्य शासनाकडून १० कोेटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. हे नाट्यगृह उभारणीसाठी आणखी ६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाच्याच मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये नाट्यगृहासाठी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, सध्या परभणी जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपेपर्यंत निधी मिळणे शक्य नसल्याने परभणीकरांना २१ मे पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर या संदर्भातील हालचाली होतील.नाट्यगृहासाठीचा आराखडा तयार झाला आहे. तसेच नांदेड येथील बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता मिळाली असून विद्युत विभागाची मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव औरंगाबाद येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या आठ दिवसांत विद्युत विभागाची तांत्रिक मान्यता मिळेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही विभागांच्या तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.इमारत पाडण्याची मागितली परवानगीनाट्यगृह उभारणीसाठी निश्चित केलेल्या जागेवर बचतभवनची जुनी इमारत उभी आहे. नाट्यगृह बांधकामासाठी ही जागा मोकळी करावी लागणार असल्याने जुनी इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे मनपाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे ही इमारत पाडण्यासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार मनपा कर्मचारी किंवा कंत्राट काढून इमारत पाडण्याचे काम केले जाईल, असेही मनपातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीTheatreनाटक