लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : एकीकडे आयपीएल क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला उधान आले असतानाच लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार यावरही हजारो रुपयांच्या पैजा लागत आहेत़ यातून तालुक्यात दररोज लाखोंची उलाढाल होताना दिसून येत आहे़जिंतूर तालुक्यात सट्टा मोठ्या प्रमाणात लावला जात आहे़ आयपीएल सट्टा घेणाऱ्या २५ ते ३० बुक्या तालुक्यात कार्यरत आहेत़ ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सट्टा घेतला जातो़ आयपीएल कोण जिंकणार? दररोज होणाºया सामन्यांमध्ये कोणता संघ विजयी होणार? कोणता खेळाडू जास्त धावा काढणार? कोण जास्त विकेट घेणार? कोणता खेळाडू लवकर बाद होणार? सामनाविराचा पुरस्कार कोणाला मिळणार? आदी बाबींवर दररोज सट्टा लावला जात आहे़ यातून सट्टाबाजारात दररोज लाखोंची उलाढाल होत आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे़ विशेष म्हणजे, आयपीएल सट्ट्याबरोबरच सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लागत आहे़ परभणी लोकसभा मतदार संघातून शिवसेना येते की राष्ट्रवादी येते? यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागत आहे़ मतदार संघातील १२ तालुक्यांमध्ये कोण बाजी मारणार? कोणत्या मतदार संघातून कोणाला जास्तीचे मताधिक्य राहणार? कोणत्या गटातून, गणातून, प्रभागातून, मतदान केंद्रातून कोणत्या उमेदवाराला जास्तीचे मताधिक्य मिळणार? यावर अनेक जण पैजा लावत आहेत़ एकीकडे जिंतूर तालुक्यात कल्याण-मुंबई-मिलन हा जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच आता आयपीएल सट्टा आणि निवडणुकीच्या पैजांची भर पडली आहे़ पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़जुगारात तरुण अग्रेसरआयपीएल सट्टा व लोकसभा निवडणूक निकालाच्या पैजा लावण्यात युवकांची संख्या मोठी आहे़ शहरी भागात चालणारा सट्टा आता ग्रामीण भागातही पोहचला आहे़ विशेष म्हणजे अनेकांनी लाखोंच्या पैजा लावल्या असून, कोण बाजी मारणार यावर सट्टा बाजार गरम आहे़जिंतूर तालुक्यामध्ये आयपीएल व लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा सट्टा घेणाºया केंद्रांची संख्या १०० च्या घरात आहे़ जिंतूर शहरात ४० ते ५० ठिकाणी सट्टा घेतला जात आहे़ ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरू असून, यातून लाखोंची उलाढाल होत आहे़ विशेष म्हणजे शहरात मटका, जुगार, आयपीएल सट्टा, लोकसभा निवडणुकीच्या पैजा सुरू आहेत़ यात महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे़ परंतु, लाखोंच्या सट्टेबाजाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़
परभणी : आयपीएल क्रिकेटच्या सट्ट्याला निवडणूक पैजांची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:41 PM