लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा.बंडू जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, जालना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, गंगाप्रसाद आणेराव, सखूबाई लटपटे, सदाशिव देशमुख, अर्जुन सामाले, माणिक पोंढे, राहुल खटींग आदींची प्रमुख उपस्थिती होती. कदम म्हणाले, मराठवाडा विभाग सातत्याने दुष्काळाच्या छायेत राहतो. ही बाब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेऊन प्रत्येक वेळी शेतकºयांना मदत केली. पीक विमा प्रकरणात शेतकºयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शेतकºयांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही शेतकºयांच्या समस्या जाणून घेत पीक विमा मदत केंद्राच्या माध्यमातून त्या सोडविणार असल्याचे कदम यांनी सांगितले.पीक विम्यात झालेला गैरप्रकार खा.बंडू जाधव यांनी सर्वप्रथम उचलला आणि दिल्लीपर्यंत लावून धरत शेतकºयांना न्याय देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल अशा कोणत्याही प्रश्नावर शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी सातत्याने राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
परभणी : पीकविम्यातील गैरप्रकारांना कंपनीच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:31 PM