परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:07 AM2019-11-20T01:07:43+5:302019-11-20T01:08:30+5:30

येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती.

Parbhani: Congress councilor goes on a trip | परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर

परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती.
महानगरपालिकेच्या महापौरांची शुक्रवारी आयोजित विशेष सभेत निवड होणार आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून अनिता सोनकांबळे, राष्ट्रवादीकडून डॉ.वर्षा खिल्लारे, गवळण रोडे आणि भाजपाकडून मंगल मुद्गलकर या चार नगरसेविकांचे अर्ज दाखल झाले आहेत.
मनपात काँग्रेसचे बहुमत असले तरी पक्षाच्या नेत्यांना फोडाफोडीचे राजकारण होण्याची भीती वाटते. निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून नगरसेवकांकरिता मतदानासाठी व्हीप काढला जाणार आहे. व्हीपच्या विरोधात जाणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते, ही माहिती असतानाही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा नाही. त्यामुळे मंगळवारी मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांची बैठक झाली. त्या बैठकीत पक्षाच्या नगरसेवकांना दोन दिवसांकरीता बाहेरगावी सहलीवर पाठविले जाण्यावर चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी काँग्रेसचे अनेक नगरसेवक सहलीवर इतर जिल्ह्यात गेले.
प्रारंभी काही नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास विरोध केल्याचे समजते; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर, गटनेते भगवानराव वाघमारे यांच्या मध्यस्थीनंतर हे नगरसेवकही सहलीत सहभागी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासमवेत सभागृह नेते भगवानराव वाघमारे हे आहेत. आता हे नगरसेवक शुक्रवारी सकाळीच परभणीत परत येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे पक्ष पदाधिकारी आणि नगरसेवकांत मतभेद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक यांच्यामध्येच मतभेद निर्माण झाले असल्याचे समजते. नगरसेवकांमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट स्थानिक पक्षश्रेष्ठींच्या बाजूने आहे तर दुसरा गट पक्षश्रेष्ठींना दूर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समजते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील परभणीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? कोणाचा अर्ज शेवटपर्यंत राहतो, हा उत्सुकतेचा विषय झाला आहे.

Web Title: Parbhani: Congress councilor goes on a trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.