शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:12 AM

सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत. त्या शेतकºयांनी यापूर्वी कृषपंपासाठी वीज जोडणी घेतलेली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसणार नाही. जेणेकरुन रात्री- अपरात्री सिंचनासाठी शेतकºयांना जावे लागत होते. यापासून दिलासा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील ५ हजार ९६८ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ६०४ शेतकºयांचे अर्ज विविध कारणाअभावी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ३ हजार ३६५ अर्ज हे मंजूर झाले. त्यापैकी ८८६ शेतकºयांना सौर कृषीपंपासाठी महावितरण कंपनीने कोटेशन दिले आहे. विशेष म्हणजे कोटेशन देण्यात आलेल्या ४०६ शेतकºयांनी आपल्या हिस्स्याची रक्कमही वीज वितरण कंपनीकडे भरली आहे. कोटेशन भरलेल्या ३५९ शेतकºयांनी एजन्सीची निवड केली असून सीआरआय पंपस्, टाटा पॉवर सोलार सिस्टीम, मुद्रा सोलार, रवींद्र एनर्जी व जैन इरिगेशन सिस्टीम या एजन्सीच्या माध्यमातून ७८ शेतकºयांच्या वीज जोडणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश महावितरणने दिले असून एजन्सीनेही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पात्र ठरलेल्या ४५ शेतकºयांनी अद्यापही काम करणाºया एजन्सीची निवड केली नाही. त्यामुळे या शेतकºयांची कामे प्रलंबित आहेत. एजन्सीची निवड केल्यास लवकर कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली.१४४ शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून दिली जोडणीशेतकºयांना उच्चदाब प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने जवळपास ६ महिन्यांपूर्वी ऊर्जा विभागाने जिल्ह्यातील कृषीपंपधारकांसाठी ८६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र विद्युत रोहित्र देण्यात येत आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून ८१४ विद्युत रोहित्र अद्यापपर्यंत उभे करण्यात आले आहेत.१४४ शेतकºयांना वीज जोडणीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी दिली.अशी करावी लागते नोंदणी४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही आॅनलाईन असून शेतकºयांना स्वत: महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोणतेही कागदपत्र आॅफलाईन स्वीकारण्यात येत नाहीत. अर्जदारांनी अर्ज करीत असताना सातबारा,पाण्याचे स्त्रोत, जमिनीचे क्षेत्रफळ, आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आदींची माहिती त्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ५ एकरपर्यंत ३ एचपी व ५ एकरवरील क्षेत्रफळास ५ एचपीचा सौरपंप मंजूर केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती