शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

परभणी;बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:36 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेंतर्गत गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्रावर बैठे पथकांच्या उपस्थितीतच मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असल्याचा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाचा कॉपीमुक्त परीक्षेचा दावा फोल ठरला आहे़

अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेंतर्गत गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्रावर बैठे पथकांच्या उपस्थितीतच मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असल्याचा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाचा कॉपीमुक्त परीक्षेचा दावा फोल ठरला आहे़जिल्हाभरात २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या ५५ केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे़ कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील २३ हजार ४२२ विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसले आहेत़ बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होतील, असा शिक्षण विभागाने दावा केला होता़ परंतु, या विभागाचा दावा फोल ठरल्याची बाब बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली आहे़काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्राचे बुधवारी सदर प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशन केले़ बुधवारी सकाळी रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता़ त्या अनुषंगाने दुपारी १ च्या सुमारास कोद्री येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास भेट दिली़ त्यावेळी केंद्रावरील बैठे पथकातील कर्मचारी सीताराम लटपटे, निवृत्ती मुंडे, श्रीमती मुजमुले, कृषी विभागाचे जोंधळे आदी कर्मचारी महाविद्यालयाच्या आवारात बसलेले दिसून आले़ सदर प्रतिनिधी परीक्षा केंद्र परिसरात आल्यानंतर लटपटे यांनी विचारपूस केली़ त्यानंतर त्यांनी प्राचार्य संजय सावंत यांना आवाज देत परीक्षा हॉल दाखविण्याच्या सूचना दिल्या़ यावेळी प्राचार्य सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या केंद्रावर रसायनशास्त्र विषयासाठी येथे ३६० विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद होती़ त्यापैकी ३५७ विद्यार्थी उपस्थित आहेत़ त्यानंतर येथील परीक्षा सुरू असलेल्या वर्गामध्ये पाहणी केली असता, परीक्षार्थी, शिक्षकांसह बाहेरील व्यक्ती व इतर ठिकाणचे शिक्षकही दिसून आले़ तर परीक्षा हॉलच्या भिंतीला असलेल्या विटा काढून करण्यात आलेल्या छिद्रातून बाहेरील बाजूला असलेल्या व्यक्ती परीक्षार्थ्यांना कॉप्या पुरवीत असल्याचे दिसून आले़ सकाळच्या सत्रातील १५ हॉलपैकी २ हॉल पहिल्या मजल्यावर होते तर उर्वरित सर्वच हॉल तळमजल्यावर असल्याने आतील बहुतांश हॉलच्या भिंतीच्या विटा काढून छिद्र केल्याचे पहावयास मिळाले़ काही हॉलवरील पत्रे उचकटून ठेवल्याचे दिसून आले. येथूनच परीक्षार्थीसोबत असलेले पालक व इतर व्यक्ती बाहेरून परीक्षार्थींचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? हा प्रश्न बाहेर दे, असे म्हणत कॉप्या पुरवीत असल्याचे निदर्शनास आले़ एका बाजूच्या हॉलमध्ये परीक्षा केंद्राच्या दक्षिण बाजूची पडलेली भिंत असलेल्या भागातून आत प्रवेश करीत काही जण कॉप्या पुरवित असल्याचेही निदर्शनास आले़ त्यानंतर याबाबत कॉप्या पुरविणाºयांपैकी एकास फिरते भरारी पथक केंद्रावर येत नाही का, असे विचारले असता गंगाखेड येथून पथक निघाले की येथे माहिती मिळते़ पथक जवळच्या केंद्रापर्यंत येईपर्यंत खडान्खडा माहिती फोनवर उपलब्ध होत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले़परीक्षा केंद्र परिसरात पडणारे कागद उचलण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याचेही यावेळी पहावयास मिळाले. परीक्षा केंद्रापासून काही अंतरावर गंगाखेड-अंतरवेली रस्त्यावर परीक्षार्थ्यांना बाहेरगावाहून घेऊन आलेली उभी वाहने दिसत होती.विविध केंद्रांवर कॉप्या वाढल्या२१ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या होत असल्याचे दिसून येत आहे़ ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कोद्री येथील केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे या केंद्रावर तब्बल ८२९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत़ त्यामध्ये विज्ञान शाखेचे ३५२, कला शाखेचे ४६२ तर वाणिज्य शाखेच्या १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे़पेडगाव येथील दोन्ही केंद्रांवरही कॉप्या होत असल्याचे करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसून आले आहे़ शिवाय कारेगाव रोड परिसरातील केंद्रावरही कॉप्या होत असल्याचे शिक्षणाधिकारी कुंडगीर यांनी बुधवारी केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे़ अनेक ठिकाणी कॉप्या होत असल्या तरी महसूल विभागाकडून मात्र फारशी कडक कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे़ तसेच केंद्रांवरील बैठे पथकांच्या अस्तित्वावरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़जिल्ह्यात सात कॉपीबहाद्दरांना पकडलेबुधवारी बारावीच्या परीक्षेंतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर कॉपी करणाºया ७ जणांना पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई केली़ त्यामध्ये परभणी शहरातील कारेगाव परिसरातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, पेडगाव येथील कै ़ हरीबाई वरपूडकर उच्च माध्यमिक विद्यालय व मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील महात्मा बसवेश्वर ज्युनिअर कॉलेज या तीन केंद्रांवर प्रत्येकी १ अशा तीन कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली़ पेडगाव येथील श्री बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रावर मात्र ४ कॉपीबहद्दरांवर कारवाई करण्यात आली़भरारी पथकावर खबºयांची नजरकोद्री येथील परीक्षा केंद्राला भेट देण्यासाठी बाहेरून येणाºया भरारी पथकावर कॉपी पुरविणाºया काही खबºयांची नजर असल्याचे यावेळी परीक्षा केंद्राबाहेरील व्यक्तींशी चर्चा करताना समजले़ गंगाखेडहून भरारी पथक निघाल्यानंतर ते कुठपर्यंत आले, वाहन कोणते आहे? आदीबाबतची इत्भूत माहिती खबºयांमार्फत संबंधितांना दिली जात असल्याचेही यावेळी उपस्थितांनी चर्चेतून सांगितले.कुंडगीर यांनी परीक्षा केंद्रावर मांडले ठाणमाध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ आऱ कुंडगीर यांनी बुधवारी दिवसभर परभणी शहरातील कारेगाव परिरातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ठाण मांडले़ यावेळी त्यांनी केलेल्या तपासणीत येथे एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला़ या विद्यार्थ्यावर त्यांनी कारवाई केली़