लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ८४ टेबलचे नियोजन केले असून, प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षण अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परभणी लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. २३ मे रोजी या मतदारसंघातील मतमोजणी होणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मंगळवारी पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी श्री पी.शिवशंकर यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.परभणी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, या मतदारसंघातील मतदार केंद्रनिहाय मतमोजणीसाठी ८४ टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चार टेबलवर पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सभागृहात १४ मे रोजी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, अपर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, आरडीसी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.विधानसभानिहाय होणाºया मतमोजणीच्या फेºयाच्मतमोजणी दरम्यान जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या एकूण २९ फेºया होणार आहेत तसेच परभणी विधानसभा मतदार संघाच्या २२, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी २९, परतूर विधानसभा मतदार संघाच्या २४ आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेºया होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंधच्मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणीस्थळी मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. एकाही कर्मचाºयाने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिल्या.
परभणी : ८४ टेबलवर होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:03 AM