लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी १३ जानेवारी रोजी कारवाई करुन शेतात लपवून ठेवलेल्या देशी आणि विदेशी दारुच्या ६७८ बाटल्या जप्त केल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.पालम तालुक्यातील शेतशिवारामध्ये दारु लपवून ठेवल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली होती. या आधारे पोलिसांनी छापे टाकले. त्यावेळी आरोपी रमेश शेषराव किरडे (रा.चाटोरी), राजाभाऊ सुभाष किरडे (चाटोरी) या दोघांनी अवैधरीत्या साठा केल्याचे समोर आले. पोलिसांनी देशी दारुच्या ५७६ बाटल्या आणि विदेशी दारुच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३८ व २४ अशा ६७८ बाटल्या जप्त केल्या.या दारुची किंमत ३९ हजार रुपये १२ रुपये एवढी आहे.दोन्ही आरोपींविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, संजय शेळके, शिवा धुळगुंडे, सय्यद मोबीन, रामकिशन काळे, सय्यद मोईन, किशोर चव्हाण, अरुण कांबळे यांनी केली.पाथरीत दहा हजारांची दारु पकडली४परभणी- पाथरी शहरातील बांदरवाडा रस्त्यावरील एका सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या विक्री होणारी १० हजार ५६० रुपयांची दारु पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १४ जानेवारी रोजी जप्त केली. पाथरी शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समोरुन बांदरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सोमवारी या ठिकाणी छापा टाकला तेव्हा भिंगरी संत्र्याच्या १९२ बाटल्या पोलिसांना आढळल्या. १० हजार ५६० रुपयांची ही दारु जप्त करण्यात आली आहे. तसेच एम.एच.२६ -क्यू ३५३७ या क्रमांकाची मोटारसायकल, दोन मोबाईल असा ५७ हजार ५६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.४ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.जी.पांचाळ, हनुमंत कच्छवे, सखाराम टेकुळे, घनसावंत, कांदे, कोल्हे, भोरगे, मुंडे आदींनी केली.
परभणी : शेतात लपविलेल्या देशी दारुच्या बाटल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:32 AM