लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ न्यायालयांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते़ ही बाब लक्षात घेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार १७ मार्चपासून न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत केले जाणार असून, न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी १०़३० ते दुपारी २़३० पर्यंतची वेळ राहणार आहे़दुपारी २़३० नंतर न्यायालयांमध्ये कोणीही थांबणार नाही़ या संदर्भाने अधीक्षक व सहाय्यक अधिक्षकांच्या मदतीने योग्य ती उपाययोजना करावी, या कालावधीत न्यायालयातील कर्मचारी आळीपाळीने न्यायालयात उपस्थित राहतील, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ कर्मचाऱ्यांचीही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या काळात जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, मनाई हुकूमाचे तातडीच्या आदेशाचे अर्ज, रिमांडचे कामकाज, स्थगन आदेश आदी अत्यंत महत्त्वाची कामेच करावीत, असे या आदेशात म्हटले आहे़तसेच दुपारी २़३० नंतर वकील संघ कार्यालय, उपहार गृह, न्यायालयीन परिसरात पक्षकार, वकील, कर्मचारी असे कोणीही थांबणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्या़ व्ही़व्ही़ बांबर्डे यांनी काढले आहेत़शासकीय कार्यालयात आवश्यक कामासाठीच या४गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया अभ्यंगतांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक किंवा निकडीचे काम असेल तरच शासकीय कार्यालयात यावे, कामाशिवाय नागरिकांनी या कार्यालयांमध्ये जाण्याचे टाळावे, अत्यावश्यक कामासाठी मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे़पिठलं-भाकर महाप्रसाद रद्द४परभणी शहरातील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे गत दहा वर्षापासून दर गुरुवारी भाविकांना देण्यात येणारा पिठलं-भाकरीचा प्रसाद कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून बंद करण्यात आला असल्याची माहिती मंदिर संस्थानचे प्रमुख प. पू. मकरंद महाराज यांनी दिली़ तसेच शहरातील अष्टभूजा देवी मंदिरात सकाळी ७़३० व सायंकाळी ७़३० वाजता नियमितपणे होणारी आरती या पुढे फक्त पुजारीच करणार आहेत़
परभणी : न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत ३१ मार्चपर्यंत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:44 PM