लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळदरी अंतर्गत गंगाखेड शहरातील बी.एड. महाविद्यालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन १ मे रोजी संस्थाचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.संस्थाध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, सहसचिव गंगाधर मुंडे, तत्कालीन प्राचार्या शोभा कुलकर्णी यांनी येथील बी.एड. महाविद्यालयाच्या खात्यातून २३ सप्टेंबर २००५ रोजी १७ लाख रुपयांचा धनाकर्ष काढला व या रक्कमेपैकी ३ लाख ८ हजार ९२२ रुपयांचे बांधकाम साहित्य संस्थाध्यक्ष ज्ञानोबा मुंडे यांच्या पत्नी ललिता मुंडे यांनी स्वत:च्या घर बांधकामासाठी खरेदी करुन संस्थेच्या रक्कमेचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी तत्कालीन सचिव नाथराव मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.मात्र तपासी अंमलदाराने वरिष्ठांचे मार्गदर्शन न घेता या गुन्ह्यात बी फायनल केले होते.दरम्यानच्या काळात याच संस्थेच्या औरंगाबाद येथील चित्रकला महाविद्यालयातील लिपीक प्रकाश विठ्ठलराव मुंडे यांचा पगार नियमित मिळत नसल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र संस्थाचालकांनी न्यायालयाच्या आदेशाचेही पालन केले नसल्याने प्रकाश मुंडे यांनी गंगाखेड येथील न्यायालयात सविस्तर फिर्याद दिली. त्यात संस्थेअंतर्गत दिली होती. गंगाखेड न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन संस्थाध्यक्ष ज्ञानोबा सीताराम मुंडे, गंगाधर डिगंबरराव मुंडे, तत्कालीन प्राचार्या शोभा विठ्ठलराव कुलकर्णी व ललिताबाई ज्ञानोबा मुंडे अशा चार गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : शिक्षण संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:11 AM