शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

परभणी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:26 PM

तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२१ एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास तहसीलदार विद्याचरण कडवकर व त्यांच्या पथकाने धार शिवारामध्ये ही कारवाई केली. त्यावेळी एम.एच.०४-डीएस ७६३५, एम.एच.४३ वाय १०७२ आणि एम.एच. ०६ एसी ४९२० या टिप्परमधून वाळूची वाहतूक होत असल्याची बाब निदर्शनास आली. पथकाने हे तिन्ही टिप्पर जप्त केले आहेत. तसेच एम.एच.४३-यू.३५९३ या टिप्परच्या चालकाने या भागातून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी मंडळ अधिकारी गजानन कण्व यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये टिप्पर चालक, मालक व मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार विद्याचरण कडवकर, माणिक गिरी, कोतवाल आकाश मोरे, प्रियेश हिंगे, गिरीष देशमुख यांच्या पथकाने केली. या कारवाई दरम्यान, अमोल बुचाले, दयानंद भिसे, सिद्धार्थ रायबोले, दिनेश बाणमारे, अनिल गवळी, दत्ता रगडे, संतोष चोपडे, अंकुश चोपडे, बाळू ऊर्फ विष्णू चोपडे, केदार चोपडे, परमेश्वर चोपडे, शिवाजी चोपडे, दत्तराव चोपडे, मधुकर चोपडे, आकाश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे या १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे वाळू चोरी बरोबरच आरोपींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग अधिनियमानुसारही गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी