लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील साडेगाव येथे १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील निकृष्टता चव्हाट्यावर आली असून वर्षभरातच या बंधाºयाला भेगा पडल्याची बाब सोमवारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली.परभणी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक ठिकाणी निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामध्ये साडेगाव येथील तक्रारीची भर पडली आहे. साडेगाव येथे जानेवारी ते एप्रिल २०१८ या कालावधीत १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन ६ सिमेंट बंधारे उभारण्यात आले होते. लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या या बंधाºयांची कामे निकृष्ट झाली. त्यामुळे बंधाºयामध्ये निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार पाण्याची साठवणूक होणे अवघड होते. सदरील बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने पिचिंग आणि खोलीकरणाचे काम व्यवस्थितरित्या केले नाही. नाल्याचे खोदकाम करुन नाल्यावर पाणी अडविण्यासाठी सिमेंट बंधाºयाची कामे करताना निकृष्ट वाळूचा वापर करण्यात आला. त्यामुळे या बंधाºयाच्या कामाची गुणवत्ता समाधानकारक राहिली नाही. बंधाºयातून काढलेली माती बाजुलाच टाकल्याने ती पुन्हा बंधाºयामध्ये आली आहे. त्याचा पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साडेगाव येथील श्रीकांत देवडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी त्रयस्थ खाजगी एजन्सीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या खाजगी एजन्सीच्या चौकशी समितीने सोमवारी प्रत्यक्ष कामाची तपासणी केली. त्यावेळी बंधाºयास तडे गेल्याचे दिसून आले. बंधाºयाच्या बाजुला माती टाकल्याने ती परत बंधाºयात आल्याचे निदर्शनास आले. शिवाय बंधारा बांधकामातही निकृष्ट साहित्य वापरल्याचे दिसून आले. बंधाºयाची रुंदीही समाधानकारक केलेली नसल्याचे पहावयास मिळाले.यावेळी चौकशी पथकाने मशीनच्या सहाय्याने बंधाºयाचे मोजमाप केले. यावेळी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याचे दिसून आले. यावेळी अभियंता पाटील, दीपक, तलाठी पेंडलवार, श्रीकांत देवडे, सारंग मोरे, सचिन नाईक, मुंजा नाईक, व्यवहारे, कृष्णा मोरे आदी शेतकºयांचीही उपस्थिती होती.लघु पाटबंधारे विभागाची टाळाटाळ४साडेगाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या ६ सिमेंट बंधाºयांची कामे निकृष्ट झाल्याची तक्रार केल्यानंतरही लघु पाटबंधारे विभागाने चौकशी करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली. याबाबत श्रीकांत देवडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यामुळे या चौकशीस टाळाटाळ करणाºया लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी- कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी साडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.बंधारा कामात अशा आढळल्या त्रुटी४१ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या ६ बंधाºयांच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. मुळात बंधाºयासाठीची ठिकाणेच चुकीची निवडल्या गेली, बंधाºयाचे खोलीकरण व्यवस्थित झाले नाही, वाळू, लोखंडी गज आदी निकृष्ट साहित्याचा वापर केला. त्यामुळे तपासणी करताना भेगा पडलेल्या जागेतून हाताने सिमेंट निघत असल्याचे पथकाच्या तपासणीत दिसून आले. पायाभरणीसाठी दगडांचा वापर करण्यात आला. त्यामध्ये सिमेंटच टाकण्यात आले नाही.मशीन पडल्या बंद४सिमेंट बंधाºयाच्या कामाची ३ हॅमर मशीनमार्फत तपासणी करण्यात येत होती. यावेळी तिन्ही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्या बंद पडल्या. त्यामुळे कामाचे मोजमाप व दर्जा तपासताना अडथळा आला, तशी नोंद तपासणीच्या पंचनाम्यात करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला चांगल्या दर्जाच्या मशीन आणाव्या लागणार आहेत.
परभणी : सिमेंट बंधारा कामात निकृष्टतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:56 PM