शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

परभणी : एड्स जनजागृतीसाठी काढली सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:30 AM

येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़डॉ़ पवन चांडक, आकाश गिते आणि प्रा़ शरद लोहट या तिघांनी २९ जून रोजी पुणे स्टेशन येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली़ लोणीकंद, थेवूळ, उरली कांचनमार्गे यवत जवळ जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन पालखीतील वारकऱ्यांशी संवाद साधला़ त्यानंतर चौफुलामार्गे पाटस येथील जगताप, नवनाथ शिथोळे व ग्रामस्थांनी या सायकलस्वारांचे स्वागत केले़भिगवण येथे रोटरी क्लबच्या सदस्यांशी संवाद साधत या ठिकाणी मुक्काम करण्यात आला़३० जून रोजी इंदापूर येथील सायकलिंग क्लब, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर काँग्रेसभवन आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली़ अकलूज, वेळापूरमार्गे पंढरपूर येथे पोहचल्यानंतर पालवी प्रकल्पातील ८५ एड्सग्रस्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत या प्रकल्पातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडची मदत करण्यात आली़या सायकलवारीसाठी निसर्ग सायकल मित्र पुणे येथील सदस्य, नवनाथ शिथोळे, विशाल मुंदडा, वेळापूर येथील औदंूंबर भिसे, भिगवण येथील संजय चौधरी, डॉ़ जयप्रकाश खरड, इंदापूर येथील कैलास कदम, पालवी येथील डिम्पल घाडगे, मंगलाताई शहा यांचे सहकार्य लाभल्याचे डॉ़ चांडक यांनी सांगितले़५० हजार किमीचा टप्पा पूर्ण४डॉ़ पवन चांडक यांनी सहावी पंढरपूर सायकलवारी पूर्ण केली आहे़ या वारीसोबतच मागील साडेपाच वर्षांत विविध भागात त्यांनी सायकलिंग करीत जनजागृती केली़ आतापर्यंत त्यांनी ५० हजार किमी सायकलिंग प्रवास केला असून, त्याद्वारे जनजागृती केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCyclingसायकलिंग