लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वाºयासह पावसाने वीज वितरण कंपनीचे २ कोटी ९६ लाख २० हजार २८८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे कृषीपंपधारकांसह घरगुती ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.परभणी येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने १० उपविभागांतर्गत जवळपास अडीच लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे़ वीजपुरवठा होताना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत, त्याचबरोबर एखादी समस्या निर्माण झाल्यास ती तत्काळ निकाली काढण्यासाठी महावितरण कंपनीने सोनपेठ, जिंतूर, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड, परभणी शहर, पूर्णा, पाथरी व परभणी ग्रामीण या दहा उपविभागांची निर्मिती केली आहे़ यामधून वीज ग्राहकांना आलेल्या समस्यांची सोडवणूक केली जात आहे़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली़ या वाºयामध्ये वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले़ उच्चदाब, लघुदाब पोलसह विद्युत रोहित्र, वीज तारा अक्षरश: उन्मळून पडले़ त्यामुळे वीज ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागले़ त्यामध्ये महावितरणलाही मोठे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती समोर आली आहे़ जिल्ह्यात उच्चदाब लाईनचे २७६ तर लघुदाब वाहिनीचे २६६ असे एकूण ५३७ पोलचे नुकसान झाले आहे़ तसेच उच्चदाब वाहिनीचे ७३ किमी तारेचे तर लघुदाब वाहिनीचे ५ किमी तारेचे नुकसान झाले आहे़ १२ विद्युत रोहित्रही कोसळून खाली पडले आहेत़ यामध्ये महावितरणला २ कोटी ९६ लाख २० हजार २८८ रुपयांचे नुकसान वादळी वाºयाने झाले आहे़असे झाले नुकसानवीज वितरण कंपनीच्या परभणी शहरांतर्गत ३ हजार ९३६, परभणी ग्रामीणमध्ये २१ लाख ९४ हजार ८८४, पाथरी उपविभागात ७ लाख २२ हजार ९२०, पूर्णा ४ लाख १ हजार ६६ रुपये, गंगाखेड २ कोटी ३९ लाख १२ हजार २६८, पालम ६ लाख ७४ हजार ४६, मानवत ६ हजार ७९२, जिंतूर ३३ हजार ७६८ तर सोनपेठ उपविभागांत १ लाख ६७ हजार ६०८ रुपयांचे नुकसान झाले आहे़ तर सेलू उपविभागात झालेल्या वादळी वाºयात कोणतेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल महावितरणने तयार केला आह़े़
परभणी : वादळी वाऱ्याने ३ कोटी रुपयांचे झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:37 AM